adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी यांचे पंतप्रधान योजनेचे पैसे तात्काळ मिळावे मनसेची मागणी .

  शेतकरी यांचे पंतप्रधान योजनेचे पैसे तात्काळ मिळावे मनसेची मागणी . प्रांताधिकारी यांना दिले निवेदन . यावल प्रतिनिधी :- ( शब्बीर खान )  (संप...

 शेतकरी यांचे पंतप्रधान योजनेचे पैसे तात्काळ मिळावे मनसेची मागणी .

प्रांताधिकारी यांना दिले निवेदन .


यावल प्रतिनिधी :- ( शब्बीर खान ) 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

शेतकरी यांचे पंतप्रधान किसान योजनेचे पैस मिळण्याबाबत. मनसेचे राज्य उपाध्यक्ष जनहितक क्षाचे चेतन अढळकर यांनी प्रांत अधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे

 तसेच यावल रावेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत असून त्यात रावेर भागातील व यावल भागातील काही शेतकरी बांधवांना त्या योजनेचा लाभ आजपावेतो मिळालेला नाही. तरी त्यांनी वारंवार तक्रारी करून सुध्दा त्यांना त्या योजनेचा लाभ देण्यासाठी आपल्या स्तरावर आपण त्याच्या समस्या सोडवाव्यात व अल्प भूधारक शेतकऱ्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा. तसेच यावल रावेर तालुक्यात काही महीन्यापासून शेतकरी घेत असलेल्या ठिबक व ड्रिप संच अनुदान हे जळगांव जिल्हयात १२० कोटी शेतकऱ्यांचे येणे बाकी आहे सन २०२३-२४ चे दिले जाणारे अतिरिक्त अनुदानाची रक्कम बाकी आहे. दीड वर्ष उलटून गेल्यावरही शेतकरी त्या अनुदानापासून वंचित आहे. फळबाग व इतर पिके वाचवण्यासाठी योजनेसाठी निधी हा उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणून लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून दयावे. शासन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत असले तरी कागदी घोडे नाचवणारी मंडळ या योजनांत अडसर ठरत आहे. यावल व रावेर तालुक्यातील पीक कर्ज घेतांना त्या शेतकऱ्याचा सातबारा बघितला जातो. सर्व शेतकऱ्यांना शेतीतून पुरसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेती कसण्यासाठी त्यांना सातत्याने पीक कर्जाचा आधार घ्यावा लागतो. शेतीमालाला हमीभाव नसतो. मजुरी याचा वाढता खर्च अशा अनेकानेक कारणांनी शेती परवडत नाही. तरी शेतकऱ्यांना शासनाकडून विविध बँका तसेच सहकारी संस्थामार्फत कर्ज पुरवठा कोणत्याही अटी विना करण्यात यावा. ही हया निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे आपणांस विनंती आहे. असे न झाल्यास आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेवून आंदोलन करू याची आपण नोंद घ्यावी. अशी मागणी केली आहे



(चेतन दिलीप अढळकर) राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र जनहीत व विधी विभाग, जळगांव


किशोर नन्नवरे तालुका संघटक 

राहुल महाजन

पवन गोवान महाजन

विजय पाटील

दिलीप चौधरी आदी च्या स्वाक्षऱ्या आहे .

No comments