आमरण उपोषणाला नऊव्या दिवशी पण न्याय मिळत नसल्याने प्रशासनाच्या विरोधात कोळी महादेव जमात पेटून उठून घेणार टोकाची भूमिका उपोषण मंडपात उपोषण...
आमरण उपोषणाला नऊव्या दिवशी पण न्याय मिळत नसल्याने प्रशासनाच्या विरोधात कोळी महादेव जमात पेटून उठून घेणार टोकाची भूमिका
उपोषण मंडपात उपोषणकर्ते तब्बेत खालवली तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष
अमोल बावस्कार :- बुलढाणा विभाग प्रमुख
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर,नांदुरा, मोताळा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे गेल्या १३ ऑगस्टपासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे.यात कोळी महादेव जमातीचे ज्ञानेश्वर काशिराम खवले,मनोहर भोलणकर,सूरज तायडे आणि संदीप सपकाळ यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे आज उपोषणाला नऊ वा दिवस असून सुद्धा शासन प्रशासनाने जमातीला न्याय मिळून दिला नसून आज उपोषण मंडपात उपोषणकर्ते संदीप सपकाळ, सूरज तायडे यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आदिवासी कोळी महादेव जमातीला भारतीय राज्यघटनेचे कलम ३४२ नुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आलेले आहे.तरीही उपविभागीय अधिकारी हे आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे या जमातीमधील विद्यार्थी, बेरोजगार,शेतकरी,मजूर यांना शासनाच्या विविध योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही.
त्यामुळे अडी अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या विरोधात आदिवासी जमातीमध्ये असंतोष निर्माण झाला असून नऊ वा दिवस असून न्याय मिळत नसल्याचे बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमात पेटून उठण्याची दाट शक्यता आहे.



No comments