हातेड खुर्द श्री महेंद्र शिरसाठ यांचा स्वातंत्र्यदिनी मा.जिल्हाधिकारी साहेब तसेच ना.श्री गुलाबराव पाटील,यांच्याकडून " उत्कृष्ट शिपाई ...
हातेड खुर्द श्री महेंद्र शिरसाठ यांचा स्वातंत्र्यदिनी मा.जिल्हाधिकारी साहेब तसेच ना.श्री गुलाबराव पाटील,यांच्याकडून "उत्कृष्ट शिपाई ", म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आपल्या हातेड खुर्द येथे सन २०२१ पर्यंत कोतवाल म्हणून कार्यरत व सद्या प्रांत कार्यालय अमळनेर येथे शिपाई म्हणून कार्यरत श्री महेंद्र शिरसाठ यांचा स्वातंत्र्यदिनी मा.जिल्हाधिकारी साहेब तसेच ना.श्री गुलाबराव पाटील,यांच्याकडून "उत्कृष्ट शिपाई ", म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, महसूल खात्यात राहूनही महेंद्र शिरसाठ यांच्या अंगी वडिलोपार्जित असलेल्या सुसंस्कृत विचारांची व कुणाच्या ही मदतीला धावून येतात
तरी महेंद्र शिरसाठ यांना महसूल पंधरवडा निमित्ताने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महेंद्र शिरसाठ यांनी कोतवाल म्हणून देखील अतिशय प्रामाणिक कार्य केले होते. म्हणून सर्व हातेड खुर्द ग्रामस्थांच्या वतीने श्री महेंद्र शिरसाठ यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्यावर मित्रपरिवार व नातेवाईक यांचेकडून त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे


No comments