adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

..‌अवघ्या काही तासातच मोटारसायकल चोरास अटक सावदा पोलीसांची उत्कृष्ट धडक कारवाई

 ..‌अवघ्या काही तासातच मोटारसायकल चोरास अटक  सावदा पोलीसांची उत्कृष्ट धडक कारवाई            रावेर प्रतिनिधी :- मोहसिन तडवी   संपादक :-हेमकां...

 ..‌अवघ्या काही तासातच मोटारसायकल चोरास अटक  सावदा पोलीसांची उत्कृष्ट धडक कारवाई     


     

रावेर प्रतिनिधी :- मोहसिन तडवी  

संपादक :-हेमकांत गायकवाड     

  रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील दि १७/०८/२०२४रोजी रात्री ०९:३० ते दि.१८/०८/२०२४ रोजीच्या सकाळी ०५:०० वाजेच्या दरम्यान रोझोदा ता.रावेर येथील कमलाकर एकनाथ पाटील वय- ५४ यांची ४५०००/- रुपये किमतीची  बजाज डिस्कव्हर १२५ सीसी लाल काळ्या रंगाची मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घरासमोरुन चोरुन नेली होती. यासंबंधीची तक्रार सावदा पोलीस स्टेशनला दि.१८/०८/२०२४ रोजी २२:३९ वाजता भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर मोटारसायकल चोरी बाबत कोणतीही खात्रीलायक माहिती अथवा बातमी नसतांना सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपासचक्रे फिरवून सावदा पोलीस स्टेशन कडील स्टाफने गोपनीय माहीतीच्या आधारे चोरीस गेलेली मोटर सायकल व आरोपी याचा तपास करुन आरोपी नामे दिनेश लखन बारेला वय -३६ वर्षे,  रा. खयडी -बरडी प्रिंप्रीजवळ ता.भिकनगाव जि.खरगोन मध्यप्रदेश यास शिताफिने पकडुन त्याचेकडुन चोरीस गेलेली मोटर सायकल हस्तगत केली आहे. सदरचा गुन्हा काही तासातच उघडकिस आणून उत्तम कामगीरी केलेली आहे.          सदरची धडक उत्कृष्ट कामगिरी  प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पो स्टे येथील नेमणुकीचे स .फौ बशीर तडवी, पोह संजीव चौधरी, पो.कॉ विनोद तडवी, पो.कॉ मझहर पठाण, पोना निलेश बाविस्कर यांनी केली आहे.                 चौकट घेणे [सावदा पोलीस स्टेशन चा नुकतीच नियुक्ती होऊन पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणून सोडले आहेत सपोनि पाटील यांनी पोलीस स्टेशनची सुत्रे हाती घेतल्यापासून दोन नबरी सध्यातरी भुमिगत झाल्याचे स्पष्ट चित्र दिसतेय] यासह अनेक कारवाया सुरू असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर देत असून व जातीय सलोखा एकात्मता टिकवून ठेवण्यासाठीही सपोनि विशाल पाटील प्रयत्नशील आहेत

No comments