परप्रांतीय इसमाला चोपडा बस स्टँड परीसरात त्याच्या ताब्यातील ४ किलो १०० ग्रॅम गांजासह अटक काल्पनिक चित्र चोपडा शहर पोलिसांची कारवाई चो...
परप्रांतीय इसमाला चोपडा बस स्टँड परीसरात त्याच्या ताब्यातील ४ किलो १०० ग्रॅम गांजासह अटक 
काल्पनिक चित्र
चोपडा शहर पोलिसांची कारवाई
चोपडा :- प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
परप्रांतीय इसमाला चोपडा बस स्टँड परीसरात त्याच्या ताब्यातील ४ किलो १०० ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती अशी की
चोपडा शहरामधील बसस्टँड परीसरात एक उत्तरप्रदेश येथील इसम स्वतःचे ताब्यात गांजा बाळगुन फिरत असल्याचे व बसने निघुन जाण्याच्या तयारीत असल्याबाबतची चोपडा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांना दिनांक २०/०८/२०२४ रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचुन दिनांक २०/०८/२०२४ रोजी २३.३० वा चे सुमारास चोपडा बस स्टँड परीसरात मिळुन आलेला इसम रामकिशन मुनीब चौहान, वय २४ वर्षे, धंदा मजुरी, रा. दुबारी, तहसील मधुबन, थाना मधुबन, जि. महु, उत्तरप्रदेश यास त्याच्या ताब्यातील ४ किलो १०० ग्रॅम गांजासह पकडले असुन त्यांच्यावर चोपडा शहर पोलीस ठाणे ३९४/२०२४ एन डी पी एस ॲक्ट कलम ८ (c) सह २० (b) (ii) (B) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये मिळुन आलेल्या इसमास अटक करण्यात आलेली असुन त्यास दिनांक २१/०८/२०२४ रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दिनांक २३/०८/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सदरील गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत. सदरील कारवाई मा. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर मॅडम व पोलीस उपअधिक्षक डॉ कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पो. हवा. रितेश चौधरी, पो.शि बोरसे, पो. शि. पंकज ठाकुर यांनी पार पाडली.
No comments