adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा विधान मतदार संघात माजी आमदार प्रा.चद्रकांत सोनवणे यांची चाणक्य नीती ठरणार जादुई..७० गावात ७९ विकास कामांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर

  चोपडा विधान मतदार संघात माजी आमदार प्रा.चद्रकांत सोनवणे यांची चाणक्य नीती ठरणार जादुई..७० गावात ७९ विकास कामांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर ...

 चोपडा विधान मतदार संघात माजी आमदार प्रा.चद्रकांत सोनवणे यांची चाणक्य नीती ठरणार जादुई..७० गावात ७९ विकास कामांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-चोपडा 

(संपादक :- हेमकांत गायकवाड) विधानसभा मतदारसंघात धडाकेबाज आ. सौ लताताई सोनवणे व चाणक्य नीतीचे अभ्यासू व्यक्तीमत्व  माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मुलभूत सुविधा (२५१५) व (१२३८ )योजनेअंतर्गत ७९ विकास कामांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.गावा गावात विकास कामे घेण्यात आली आहेत . सर्वत्र उद्घाटनाचा पुन्हा डंका वाजणार असल्याने विरोधकांच्या चांगल्याच कानठळ्या बसणार आहेत.निवडणूकीचे पडघम वाजण्या आधीच कामांची बुलेट ट्रेन आणल्याने हवश्या नवश्यांना चांगलीच चपराक बसली असल्याचे मत तालकावासियांनी व्यक्त केले आहे.

ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. विकास-२०२४/प्र.क्र.१६८/भाग-३/योजना-६, दि. १४ ऑगस्ट, २०२४ च्या आदेशान्वये मतदार संघातील विकास कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर झाली आहेत  यात हर एक  गावाचा समावेश असून कोणत्याही गावावर सापत्न वागणूक देण्यात आलेली नसून चौफेर विकास साधण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला आहे. "जो न देखे रवी वो देखे कवी" असे कवितेचे बोलही प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी फिके पाडले असून त्या पलीकडे आपली दूरदृष्टी ठेवत विकास कामे घेतली आहेत . चोपड्याच्या ईतिहासात आजपर्यंत कोणत्याही लोकनेत्याची नजर पोहचलेली नव्हती.अशा कोपऱ्यातील गावाचा विकास साधण्यात अण्णासाहेब एक पाऊल पुढे आहेत. या विकास कामांमध्ये रस्ता ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण, सभामंडप, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह,यांचा समावेश असून जवळपास ७० गावांत हा विकास साधला जाणार आहे.

No comments