४ हजार पेक्षा अधिक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीचे उपोषण. गरिबांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाका- प्रशांत ...
४ हजार पेक्षा अधिक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीचे उपोषण.
गरिबांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाका- प्रशांत डिक्कर
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- अमोल बावस्कार मलकापूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
(जळगाव बुलढाणा)/२२ जुलै २०२३ च्या अतिवृष्टीने जळगाव तालुक्यात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना अधिकारी व सत्ताधारी पुढाऱ्यांनी संगणमत करुन खऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
त्यामुळे नुकसानग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला प्रशांत डिक्कर यांनी मा. उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
याची माहिती मिळताच जळगाव जा. तहसीलदार यांनी प्रशांत डिक्कर यांची सायंकाळी उपोषण मंडपात जाऊन भेट घेतली. मा.तहसीलदार यांनी चर्चा करतांना सांगितले नुकसानग्रस्तांच्या सानुग्रह यादीच्या कार्यालयात येऊन अवलोकन करा पंरतु शासनाने निधी वाटप केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देता येत नसल्याचे सांगितले. वास्तविक ४ हजार पेक्षा अधिक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यातील शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे हडपले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासन पुन्हा कशी मदत देईल असा सवाल प्रशांत डिक्कर यांनी उपस्थित केला. पण आपदग्रस्त लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाची आर या पार लढाई असणार आहे. घर पडझड मधे ७ हजार पेक्षा अधिक वाटप केलेल्या सानुग्रह अनुदान वाटपात मर्जीतील कुटुंबाला डबल लाभ दिल्याने तहसील कार्यालयाने खऱ्या लाभार्थ्यांना मदत न देता केवळ त्रस्त करून सोडले आहे. या मदत वाटपात सर्वाधिक घोळ आढळून आल्याचे लक्षात येऊनही अधिकारी लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली असल्याने शेतकऱ्यांच्या याद्या कार्यलयात दाबुन ठेवल्या आहेत. घर पडझडच्या सानुग्रह अनुदान वाटपातील लाभार्थ्यांची यादी जाहिर केल्यास महाघोटाळा असल्याचे उघड होईल.
नुकसानग्रस्त दुकानदारांच्या वाटपात असाच प्रकार असल्याचे शहरात चौका चौकात चर्चा होत आहेत. अधिकाऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या अटी च्या बाहेर जाऊन मर्जीतील लोकांना मदत देण्यात आली. पंरतु वंचित नुकसान लाभार्थ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे प्रशांत डिक्कर यांनी गरीबांच्या उद्धारासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण दडपुन काढण्यासाठी रात्री १०/११ वाजताच्या दरम्यान वाद घालण्याच्या उद्देशाने उपोषण मंडपा भोवती काही विरोधक घिरट्या घालत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांकडुन तातडीने बंदोबस्त वाढविण्यात आला. सी सी टिव्ही कॅमेरे बसविल्याने या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित घटना घडली नाही.त्यामुळे विरोधक कोणत्याही स्थाळाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंरतु आमच्यासाठी वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणे हे महत्त्वाचे आहे. दोन दिवस होऊनही जिल्हा प्रशासन गंभीर दिसत नाही. उपविभागीय अधिकारी यांनी उपोषणाकडे पाठ फिरवली त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहु नये वेळ प्रसंग शेतकरी आक्रमक झाले तर प्रशासनाला महागात पडेल असा ईशारा प्रशांत डिक्कर यांनी जिल्हा प्रशासनाला उपोषण मंडपातुन दिला आहे.
यावेळी उपोषणाला राष्ट्रवादीचे नेते प्रसेंजित पाटील, शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख दत्ता पाटील, डॉ , संदीप वाकेकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, सामाजिक कार्यकर्ते संजय पारवे, रमेश ताडे, सय्यद बाहोद्दिन, विजय ठाकरे, तुकाराम काळपांडे, विविध राजकीय पक्षाच्या नेते वंचितचे नेते सुनिल बोदडे, उपोषणाला पाठिंबा दिला.



No comments