adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल व्हावा;सावदा येथील सुन्नी मुस्लिमांची मागणी

  रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल व्हावा;सावदा येथील सुन्नी मुस्लिमांची मागणी "सपोनि विशाल पाटील यांना निवेदन सादर" रावेर प्रतिनिधी...

 रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल व्हावा;सावदा येथील सुन्नी मुस्लिमांची मागणी

"सपोनि विशाल पाटील यांना निवेदन सादर"


रावेर प्रतिनिधी मोहसीन तडवी 

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

अहमदनगर जिल्ह्यातील सराला येथे प्रवचनात रामगिरी महाराजांनी इस्लाम धर्माचे पैंगबर साहेब यांच्या अतुलनीय व गौरवशाली जीवनावर अकारण वादग्रस्त टिका-टिपण्णी करत त्यांच्या विषयी अतिशय चुकीची माहिती देत दिशाभूल करणारे बेताल व्यक्तव्य केले.त्यामुळे पैंगबर साहेबांच्या संपूर्ण जगभरातील अनुयायी मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या,तसेच थेट दोन समाजात जाणिवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.

भविष्यात कोणी परत दोन समाजात तेढ निर्माण करणारी व धार्मिक भावना दुखावणारे गैर कृत्य करु नये,म्हणून रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई स्वरुपी फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावी,अशी मागणी शहरातील सर्व सुन्नी मुस्लीम बांधवांनी केली आहे.या संदर्भात आज १८ ऑगस्ट रोजी सावदा पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना निवेदन देण्यात आले.भविष्यात कोणीही अशी चुक करु नये, यासाठी शासनाने अशा बेताल व वाचाळवीर लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी,असेही निवेदनात नमूद आहे.

निवेदन देताना,मुस्लिम समाज प्रमुख जाहिद कारी साहेब,फरीद शेख,निसार अहमद,मोईन लाला,कलीम जनाब,शेख कमरोद्दीन,शेख सलमान रज़ा शाह,प्पपु शेख,अफसर शेख,करीम कदीर,समद गुलाब इत्यादी उपस्थित होते.

यावेळी सदर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन सादर करणाऱ्यांनी लावून धरली असता मी तूमच्या भावना शासन दरबारी कार्यालयीन स्तरावर लवकरच पाठविले जाईल असे आश्वासन यावेळी सपोनि विशाल पाटील यांना दिले.

No comments