न. प. प्रा. शाळा क्र.३ शिरपूर येथे रक्षाबंधन उत्सव संपन्न शाळेतील उपस्थित विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधली. शि...
न. प. प्रा.शाळा क्र.३ शिरपूर येथे रक्षाबंधन उत्सव संपन्न
शाळेतील उपस्थित विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधली.
शिरपूर जि.धुळे :- प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
आज दि.२०/८/२०२४ मंगळवार रोजी न .प. शाळा क्र.३ शिरपूर येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी *मानव विकास पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्माननीय श्री वसीम खाटीक साहेब*, मानव विकास पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सदस्य सन्माननीय श्री विनोद गव्हाणे सर तसेच सामाजिक कार्यकर्ता श्री महेश बडगुजर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री विकास जी शिरसाठ सर, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गणेश भाऊ बाशिंगे, सूर्यवंशी मॅडम आणि माता पालक संघाच्या सदस्या माता आदी उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना सूर्यवंशी मॅडम यांनी सादर केली. शाळेतील उपस्थित विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना सुद्धा विद्यार्थिनींनी राखी बांधली. सदर कार्यक्रमाचे ऐतिहासिक सामाजिक राष्ट्रीय महत्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेसिंग पावरा सर यांनी पटवून दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगोले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री राजेसिंग पावरा सर यांनी केले.

No comments