adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कांदा मार्केट समोर व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला तलवार कोयत्याने वार रोख रक्कमही लुटली

  कांदा मार्केट समोर व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला तलवार कोयत्याने वार रोख रक्कमही लुटली अहमदनगर :सचिन मोकळ (संपादक: हेमकांत गायकवाड) भररस्त्य...

 कांदा मार्केट समोर व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला तलवार कोयत्याने वार रोख रक्कमही लुटली


अहमदनगर :सचिन मोकळ

(संपादक: हेमकांत गायकवाड)

भररस्त्यात एका कांदा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नगरमध्ये बायपास रोडवर असणाऱ्या कांदा मार्केटसमोर ही घटना घडली.हल्लेखोरांनी व्यापार्‍यावर तलवार, कोयत्याने वार करून त्याच्या जवळील रोख रक्कम चोरून नेण्यात आली असून या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरमध्ये एका कांदा व्यापाऱ्याला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अहमदनगरच्या बायपास रोडवरील कांदा मार्केटसमोर हा थरार घडला.यावेळी हल्लेखोरांनी व्यापार्‍यावर तलवार, कोयत्याने वार प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सकाळी ११ च्या सुमारास आडते व कांदा व्यापारी सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत होते. याचवेळी बायपास रोडवर काही तरुणांनी त्यांना तलवार कोयत्याचा धाक दाखवून वार करुन हल्ला चढवला.तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम लुटून पोबारा केला.या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सय्यद यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

No comments