adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आगामी गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता कमिटी ची बैठक संपन्न

आगामी गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता कमिटी ची बैठक संपन्न  सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे - पोलीस निरीक्षक महेश पाटील रोहित राजगुरू :-जाम...

आगामी गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता कमिटी ची बैठक संपन्न 

सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे - पोलीस निरीक्षक महेश पाटील


रोहित राजगुरू :-जामखेड 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जामखेड शहरातील रस्त्यावर स्टेज टाकताना सार्वजनिक मालमत्तेचे कमीत कमी नुकसान कसे होईल याची काळजी मंडळांनी घ्यावी तसेच शाळा कॉलेज सुरू असताना मुलांना त्रास होऊ नये यासाठी स्पीकर सकाळी व संध्याकाळीच लावावेत तसेच कमीत कमी दोन्ही प्रदूषण होणार नाही. याची काळजी घ्यावी. डीजे सिस्टीम ला शासनाची परवानगी नाही मात्र मिरवणुकीत वाजवण्यात येणाऱ्या वाद्यबाबत स्थानिक पातळीवर मार्ग काढण्यात येईल. गणेश उत्सवाच्या निमित्ताने होणारे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गायन, वादन, नृत्य, नाटक, लोककला, हस्तकला, ध्वनी तंत्रज्ञान कार्यक्रम असे सार्वजनिक कार्यक्रम असावेत. यातून समाजाचे प्रबोधन होईल. तसेच स्वागत किंवा शुभेच्छा कमानी खर्डा चौक ते समर्थ हाॅस्पिटल पर्यंत लावू नये त. व डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावताना सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच रहदारीस अडथळा होणार नाही याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम अटीचे पालन करावे असे आव्हान यावेळी शांतता कमिटी बैठकीत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. 


आज रोजी दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जामखेड तहसील कार्यालय मध्ये तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने, मनसे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, उपाध्यक्ष  सनी सदाफुले, शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा ,अजय भोसले, नगरसेवक अमित जाधव, शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले, अभिजीत राळेभात, पोलीस पाटील योगेश जायभाय,सिद्धेश्वर पवार, निलेश वाघ, बिभिषण यादव ,

आकाश पिंपळे, शिवाजी येवले,शरद माने तसेच विविध मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य,सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी, आदी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या बैठकीसाठी गोपनीय विभागाचे पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले.

"गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण पूरक मूर्ती चा वापर करावा तसेच समाजामध्ये चांगले संदेश गेला पाहिजे या दृष्टीने गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, देखावे अंधश्रद्धा निर्मूलन असा नऊ ते दहा दिवसांचा कार्यक्रम आयोजित करून समाजासाठी चांगला उपक्रम गणेश उत्सव निमित्त उपलब्ध करून द्यावा.

मा.गणेश माळी 

तहसीलदार

No comments