रावेर यावल फैजपुर विभातील विद्युत तारा चोर अटकेत रावेर पोलीस व जळगांव एलसीबी ची संयुक्त कारवाई मोहसीन मुबारक तडवी रावेर (संपादक:हेमकांत...
रावेर यावल फैजपुर विभातील विद्युत तारा चोर अटकेत
रावेर पोलीस व जळगांव एलसीबी ची संयुक्त कारवाई
मोहसीन मुबारक तडवी रावेर
(संपादक:हेमकांत गायकवाड)
रावेर यावल फैजपुर शेती शिवरातील विद्युत खांबावरील वीज वाहक तारा चोरणारी टोळीला जळगाव गुन्हा अन्वेषण विभाग व रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तीन आरोपी अटकेत केले आहेत आरोपींकडून चारचाकी वाहनासहीत साडेपाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासादरम्यान धागेदोरे हाती लागल्याने 44 गुन्ह्यांची उलगडा करण्यात रावेर पोलिस यशस्वी झाले तारा चोरी प्रकरणातील नुरा केरसिंग मोरे रा झिर पांजऱ्या ता धुळकोट जि बऱ्हाणपूर, अनिल भेरसिंग मंडले रा तितराना ता धुळकोट व चोरीच्या वीज तारा घेणारा यासिन खान हुसेन खान रा उटखेडा रोड, रावेर यांना अटक करण्यात आली आहे.
रावेर परिसरातील शेती शिवरातील वीज वितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील वीज वाहक ॲल्युमिनियम तारा रात्रीच्या वेळी चोरी झाल्याचे घटना भरपूर प्रमाणात घडल्या होत्या. महावितरण वीज कंपनीचे लाखोंच्या नुकसान झाले होते वीज पुरवठा सुरू असलेल्या विद्युत खांबावरील वीज वाहक तारा चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांचे ही वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे पिकांचे नुकसानीचे संकट होते या तिन्ही वीज तारा
चोरांनी 44ठिकाणचे वीज तारा चोरी केल्याचे कबूल केले संबंधित आरोपी रात्री वीज तारा चोरीसाठी स्विप्ट डिझायर कार क्र एम पी 68 झेड सी 2546 चा वापर करीत होते. व चोरलेले तार रावेर येथील उटखेडा रोडवरील यासिन खान हुसेन खान याला विकत होते. ती कार ही पोलिसांनी जप्त केली आहे.
रावेर, फैजपूर, निंभोरा व यावल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या आठ महिन्यात वीज तारा चोरीचे प्रमाण वाढले होते. या काळात रावेर पोलीस स्टेशन यावल पोलीस स्टेशन निंभोरा पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशन मध्ये वीज तार चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर प्रकरणाचा जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या आदेशान्वये जळगांव
एलसीबी चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कर्मचारी महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रमोद ठाकूर, प्रदीप सपकाळे, तर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील रवींद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, विकार शेख, सुकेश तडवी यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना ताब्यात घेतले व 44वीज तारा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले
संबंधित आरोपी रात्री वीज तारा चोरीसाठी स्विप्ट डिझायर कार क्र एम पी 68 झेड सी 2546 चा वापर करीत होते. व चोरलेले तार रावेर येथील उटखेडा रोडवरील यासिन खान हुसेन खान याला विकत होते. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे.

No comments