जि.प.मराठी शाळा चौगाव येथे शिक्षक दिवस शिक्षकांचा सत्कार करून साजरा.... संदीप कोळी यांचा स्तुत्य उपक्रम .. चोपडा प्रतीनिधी (संपादक : ...
जि.प.मराठी शाळा चौगाव येथे शिक्षक दिवस शिक्षकांचा सत्कार करून साजरा....
संदीप कोळी यांचा स्तुत्य उपक्रम..
चोपडा प्रतीनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस याच दिवशी शिक्षक दिवस शिक्षकांचा सन्मानासाठी साजरा केला जातो.एक पालक म्हणून शिक्षण प्रेमी तथा शिवसेना तालुका प्रसिध्दी प्रमूख संदीप कोळी यांनी आई वडील नंतर आपल्या मुलांना कूणी घडवत असेल
तर,ते म्हणजे शिक्षक...शिक्षकांचे महत्व डोळ्यासमोर ठेवत संदिप कोळी यांनी जि.प.मराठी शाळा चौगाव येथील शिक्षक व शिक्षीका यांचा शाल,गुलाब पुष्प व शिक्षकांना टोपी घालून त्यांचें स्वागत सत्कार केले आहे.या कार्यक्रमाची सुरुवात शाळेत आलेल्या मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक विद्यानंद साठे तर शिक्षीका राजश्री बाविस्कर यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमा प्रसंगी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास बाविस्कर माजी उप सरपंच लासूर व संदीप कोळी यांनी शिक्षकांविषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा प्रसंगी कैलास बाविस्कर माजी उपसरपंच लासूर,पो.पा.गोरख पाटील,संदीप कोळी,
तसेच गावातील युवक संदीप सूर्यभान कोळी व शाळेतील मुख्याध्यापक संतोष सोनवणे,शिक्षक विद्यानंद साठे,शिक्षक अनिकेत पाटील,शिक्षीका राजश्री बाविस्कर,प्रिती भावसार,प्रितम सोनवणे,कविता गावित,सोबत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






No comments