वर्ल्ड व्हिजन इंडियाने केलेले सामाजिक कामे माणूसकीचे दर्शन घडविणारे.. वार्षिक मूल्यांकनात गावकऱ्यांचा खुलासा चोपडा, ( प्रतिनिधी) (संपाद...
वर्ल्ड व्हिजन इंडियाने केलेले सामाजिक कामे माणूसकीचे दर्शन घडविणारे..
वार्षिक मूल्यांकनात गावकऱ्यांचा खुलासा
चोपडा, ( प्रतिनिधी)
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव येथे काल दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे वर्षभर करण्यात आलेल्या सामाजिक कामांचे वार्षिक मूल्यांकन गावकऱ्यांतर्फे करण्यात आले.भरगच्च गुण देऊन अजून कामाची व्याप्ती वाढवावी आणि गोर गरीब जनतेचा आशेचे किरण बनलेल्या वर्ल्ड व्हिजन इंडियाने माणुसकी दर्शन घडवून मायेचा हात दिल्याने अनेकांना गहिवरून आले.चोपडा या आदिवासी भागात आपल्या वर्ल्ड व्हिजन मार्फत अनोखी सेवा गरजूंना मिळणे गरजेचे असल्याने त्या दिशेने पाऊल उचलावेत असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे ,चोपडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष तथा एनजीओ फोरमचे सचिव महेश शिरसाठ ,अमळनेर जनसाहस संस्थेचे फिल्ड ऑफिसर सोनम केदार,धरणगाव विभागाच्या जनसाथी प्रियांका गायकवाड , श्री नाथ साळुंके ,ग्रामीण रूग्णालयचे काऊस्लर शिंपी , डेंटल सहायक गणेश कुंभार ,दिव्यांग संस्थेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील,भोणे सरपंच संगीता पाटील,उपसरपंच भालचंद्र पाटील,जांभोरे उपसरपंच किशोर सुपडू भिल,वंजारी पोलीस पाटील दिलीप पाटील,शामखेडे चे पोलीस पाटील , वराड ग्रा पं सदस्या प्रमिला भिल,पिंपळे उपसरपंच किरण पाटील,साखरे गावचे सरपंच व पोलीस पाटील व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी बैठकीला संबोधित करतांना सागितले कि, कोणताही विकास एकट्याने होत नाही , त्यास प्रत्येकाच्या हातभार लागलेला असतो .विकासाचे मुख्य सूत्रधार गावकरीच असल्याचे म्हणत वर्ल्ड व्हिजनने शैक्षणिक ,आरोग्य सुविधा व आर्थिक मदत , गावासाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था, बाल स्वसंरक्षण समिती , ५० बालगट सक्रिय व मजबुतीकरण , आपत्कालीन मुलांना व कुटुंबियांना मदत ,अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाठ यांनीं गट चर्चातून सांगितले कि, चोपडा हा आदिवासी तालुका असल्याने वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या कार्याची येथे नितांत गरज असल्याने विकास क्षेत्र चोपडा व अमळनेर कडे वाढविले पाहिजे असे सुचविले. जनसाहास संस्थेचे फिल्ड ऑफिसर सोनम केदार ने स्थलांतर काम गारांना कशी मदत करता येईल व सद्या मदत करीत आहेत याबद्दल माहिती दिली .
या वेळेस धरणगाव तालुक्यातील सरपंच , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , सिआरपी , पोलीस पाटील , आरोग्य कर्मचारी विभाग , गावातील मुख्य विकास घडविणारे व्यक्ती उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन रतिलाल वळवी व अंकिता मेश्राम यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्ल्ड व्हिजन चे फायनान्स निखिल कुमार व विकास कामाचे स्वयंसेवक रचना जाधव , वैष्णवी पाटील , आरती पाटील व जितेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली.


No comments