adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रोटरी व इनरव्हील मार्फत चोपड्यात गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती व्याख्यान

  रोटरी व इनरव्हील मार्फत चोपड्यात गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती व्याख्यान चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) गर्भाशयाच्या मुखा...

 रोटरी व इनरव्हील मार्फत चोपड्यात गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती व्याख्यान


चोपडा प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखातून किंवा गर्भाशयाच्या भिंतीच्या कोणत्याही थरात उद्भवणारा कर्करोग आहे . शरीराच्या इतर भागांमध्ये आक्रमण करण्याची किंवा पसरण्याची क्षमता असलेल्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे हे होते

जगभरात, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा कर्करोगाचा चौथा-सर्वात सामान्य प्रकार आणि स्त्रियांमध्ये कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे चौथे-सर्वात सामान्य कारण आहे.


म्हणूनच  रोटरी क्लब ऑफ चोपडा इनरव्हील क्लब ऑफ चोपडा व समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती व्याख्यान

दिनांक :- 21 सप्टेंबर 2024 वार शनिवार रोजी 

सकाळी 10 वाजता समाजकार्य महाविद्यालय चोपडा

 येथे खास विद्यार्थिनींसाठी व्याख्याते :- डॉ. योगिता काटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख रोटे. डॉ. नीता जयस्वाल, डॉ. वैशाली सौंदाणकर अध्यक्षा इनरव्हील क्लब , भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा रोटे. पूनम गुजराथी , समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रोटरीचे अध्यक्ष डॉ ईश्वर सौंदाणकर सर, डॉ उपासनी मॅडम व डॉ देशपांडे मॅडम ,नर्सिंग स्कूलचे प्राचार्य पिंजारी सर मंचावर उपस्थित होत्या डॉ.नीता जयस्वाल यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना केली त्यासोबत त्यांनी गर्भाशय कॅन्सर बद्दल माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाचे व्याख्याता डॉ. योगिता काटे यांनी गर्भाशयाचा कॅन्सर हा कसा होतो तो होवू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, सोबत त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी असणारे उपाय व झाल्यास त्यावर कोणते उपचार पद्धती वापरले जाते याबद्दलचं सखोल असे वैद्यकीय ज्ञान विद्यार्थिनींना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले व सोबतच गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून यासाठी उपलब्ध असणारी लसीचे फायदे त्यांनी विद्यार्थिनींना समजून सांगितले ते सांगत असताना त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात याची लस उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी या माध्यमातून विद्यार्थिनींना आवाहन केले व लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी याविषयावर चित्र पोस्टर स्पर्धा आयोजित केलेली होती व त्यांनी काढलेले सर्व चित्र हे त्या ठिकाणी प्रदर्शन म्हणून लावण्यात आलेले होते त्यातून त्यांनी निरोगी जीवन कशा जगावे याबाबतचे चित्र प्रदर्शनातून महत्व सांगितलेले दिसून आले. आरोग्य संपत्ती ही किती महत्त्वाची असते हे स्त्रियांसाठी महत्त्वाचा आहे हे समजून सांगितले डॉ. मोहिनी उपासनी मॅडमने सूत्रसंचालन केले आणि पाहुण्यांचे व वक्त्यांचे आभार डॉ संबोधी देशपांडे मॅडम यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे , नर्सिंग स्कूलच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि इनरव्हील क्लब ऑफ चोपडा चे सदस्य बंधू-भगिनींनी मेहनत घेतली

No comments