मुक्ताईनगर येथील २१६ मंडळापैकी २० मंडळांनी काढली परवानगी मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर तालुक...
मुक्ताईनगर येथील २१६ मंडळापैकी २० मंडळांनी काढली परवानगी
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यात सार्वजनिक, खासगी व शहरातील मिळून एकूण २८५ गणेश मंडळे आहेत. त्यापैकी वीस मंडळांनी पोलिस प्रशासनाची परवानगी घेतली आहे. अद्याप बहुतांश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज देखील केलेले नाहीत. त्यामुळे उत्सवादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित गणेश मंडळांची जबाबदारी राहील, असे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.
तालुक्यात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या १३५, खासगी ११० व शहरातील ४० असे एकूण २८५ मंडळे आहेत. या सर्व मंडळांनी नियमानुसार पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. पण, केवळ २० मंडळांनी प्रक्रिया पूर्ण केली. इतर मंडळानी सुद्धा ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने मुक्ताईनगर पोलिस ठाणे व कुऱ्हा आणि अंतुर्ली दूरक्षेत्रात नोंदणी करावी. मुक्ताईनगर शहरात २० मोठी मंडळे आहेत.
दरवर्षी पूर्णा नदी पात्रात मोठे गणपती विसर्जित केले जात होते. पण आता यापुलावर दोन्ही बाजूंनी जाळी बसवली आहे. त्यामुळे खामखेडा पुलाऐवजी डोलारखड्याकडे जाणाऱ्या पूर्णा नदीवरील कोंड पुलावर विसर्जनाची सुविधा असेल. मुक्ताईनगर मार्गे वाहतूक पाहता त्यानुसार मुक्ताईनगरचा मार्ग सुरू किंवाबंद ठेवण्यात येईल. हा मार्ग बंद झाल्यास डोलारखेडा मार्ग सुरू असेल, असे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.

No comments