जिल्हा परिषद खेडीभोकरी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर शंकरराव पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर मुख्याध्यापक भास्कर शंकरराव पाटील ...
जिल्हा परिषद खेडीभोकरी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर शंकरराव पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर
मुख्याध्यापक भास्कर शंकरराव पाटील
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
नुकताच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्यामार्फत राज्यस्तरीय तापी पूर्णा आदर्श मुख्याध्यापक म्हणून भास्कर शंकरराव पाटील यांची निवड करण्यात आली. भास्कर पाटील यांनी नोकरीची सुरुवात मुक्ताईनगर येथील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या पिप्रांळे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत केली ,तर आता ते तापी नदीच्या काठावर वसलेल्या खेडीभोकरी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत हा योगायोग म्हणून भास्कर पाटील यांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
खेडी भोकरी येथे मुख्याध्यापक पद घेतल्यानंतर प्रथमच गावात सेमी इंग्रजीची शाळा सुरू केली व संपूर्ण 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करून गावात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हमी घेतली गावातून वस्तुरूपाने संपूर्ण शाळा डिजिटल केली तसेच वस्तुरूपाने प्रिंटर, साऊंड सिस्टिम ,लॅपटॉप, अनेक राष्ट्रीय नेत्यांचे प्रतीमा, मध्यांना भोजन साठी फ्रिज, विद्यार्थ्यांना शालेय दप्तर दिवाळी अभ्यासिका, सचित्र बालमित्र पुस्तके ,वह्या, पेन असे विविध वस्तू रूपाने सहभाग मिळवून विद्यार्थी गुणवत्ता विकास साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. तसेच विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन ,वृक्षारोपण वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धन यासारख्या उपक्रम शाळेत राबवून घेतले जातात तसेच तसेच सकाळ ,लोकमत, देशदूत व तरुण भारत या वृत्तपत्रातून विविध कविता व शैक्षणिक सामाजिक लेख लेखन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न भास्कर पाटील नेहमी करत असतात तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, निसर्गरम्य शाळा ,शंभर टक्के पट नोंदणी करून 100% उपस्थितीसाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात शाळेत उत्तम परसबाग वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केलेले आहे या निवडीबद्दल तालुक्याचे गटविकास अधिकारी रमेश वाघ साहेब तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील य पाटील रमेश शिरसाठ, रोहिदास कोळी, विक्रम बोरसे ,केद्रांतील सर्व शिक्षक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील उपाध्यक्ष सोपान कोळी माजी अध्यक्ष घनश्याम भाऊ सोनवणे माजी अध्यक्ष सुनील वासुदेव पाटील पद्माकर भाऊ पाटील राजू सोनगिरे ग्रामसेवक भाईदास धनगर, उपसरपंच राणछोड पाटील पोलीस पाटील कैलास नाना, पोलीस पाटील मोनिका घन:श्याम पाटील, प्रदीप पाटील व समस्त गावकऱ्यांनी भास्कर पाटील यांच्या निवडीबद्दल कौतुक केले.
No comments