जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडीभोकरी ठरली एक लाखाची मानकरी प्रतिनिधी चोपडा (संपादक :- हेमकांत गायकवाड) नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंद...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडीभोकरी ठरली एक लाखाची मानकरी
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन चे तालुकास्तरीय सर्वेक्षणाअंतर्गत गोरगावले केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावलेली जिल्हा परिषदेचे खेडीभोकरी शाळा यांनी तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला;आणि एक लाखाचे बक्षीस प्राप्त करणारी शाळा ठरली.यामध्ये शाळेने विविध सहशालेय उपक्रम, लोकसभा, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा ,दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेली कामगिरी ,शाळेने केलेल्या भौतिक सुविधा ,गुणवत्ता विकास ,विविध तंत्र स्नेही कामे, वृक्षारोपण वृक्ष संवर्धन ,तंबाखू मुक्त शाळा, प्लॅस्टिक मुक्त शाळा, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारे कार्य अशा विविध उपक्रमातून जिल्हा परिषद मराठी शाळा खेडीभोकरी यांनी यश संपादन करून गावाचे नाव लौकिक केले. यामध्ये तालुक्याचे गटविकास अधिकारी आदरणीय रमेश वाघ साहेब तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय अविनाश पाटील साहेब केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील ,केंद्रप्रमुख वैशालीताई पाटील, प्रभारी केंद्रप्रमुख विश्वनाथ पाटील, केंद्रप्रमुख दीपक पाटील, मुख्याध्यापक श्रीराम पाटील ,मोहन चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले तर शाळेचे तंत्रशिक्षक रोहिदास कोळी, रमेश शिरसाठ ,विक्रम बोरसे व मुख्याध्यापक भास्कर पाटील यांनी संपूर्ण प्रस्ताव तयार करण्यासाठी मेहनत घेतली यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष सोपान कोळी ,दीपक पाटील ,अभिमन भालेराव, सुनील वासुदेव पाटील, घन:श्याम भाऊ सोनवणे, पद्माकर पाटील ,राजू सोनगिरे,उपसरपंच रणछोड पाटील , ग्रामसेवक भाईदास धनगर ,पोलीस पाटील कैलास नाना, पोलीस पाटील मोनिका घन:श्याम पाटील ,समर्थ क्लासेस संचालक घन:श्याम सर, नेटवर्क कॉम्पुटर चे संचालक केदार पाटील, डॉ. विजय पाटील , नामदेव कोळी, पुंडलिक सोनवणे व गावातील अनेक शिक्षण प्रेमींनी, तसेच गोरगावले केंद्रातील सर्व शिक्षकांनी याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले.

No comments