जि प शाळा बोरखेडे येथे शिक्षक दिन साजरा शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षकांचा सत्कार यावल ( प्रतिनिधी ) (संपादक: हेमकांत गायकवाड) जि. ...
जि प शाळा बोरखेडे येथे शिक्षक दिन साजरा
शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षकांचा सत्कार
यावल ( प्रतिनिधी )
(संपादक: हेमकांत गायकवाड)
जि. प. शाळा बोरखेडे खुर्द येथे शिक्षण दिन साजरा करण्यात आला सर्व प्रथम डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त केले या वेळी गावातील सेवानिवृत्त शिक्षक महंमद फकीरा तडवी यांनी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस सर्वांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देउन सन्मानित केले तसेच इ १ते ७ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले (कंपास पेटी, पेन ,खोडरबर, पेन्सील शाॅपनर भेट वस्तू देण्यात आले तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकीरा तडवी ,सलीम तडवी ,हुसेन तडवी ,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नफ्ते सर ,मेघे सर ,जावेद सर, भारंबे मॅडम ,शिंदे मॅडम, चांगरे मॅडम,जि. प. शाळेचे शिक्षक रज्जाक तडवी ,अजय बाविस्कर जितेंद्र . अजित तडवी हजर होते सुत्रसंचलन हुसेन तडवी यांनी तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी मानले

No comments