adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सर्व धर्मियांना सहभागी होण्याचा हेवा वाटावा असा गणेशोत्सव साजरा करा --महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

 सर्व धर्मियांना सहभागी होण्याचा हेवा वाटावा असा गणेशोत्सव साजरा करा -- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर  शांतता समिती बैठकीत आवाहन...

 सर्व धर्मियांना सहभागी होण्याचा हेवा वाटावा असा गणेशोत्सव साजरा करा --महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज


फैजपूर  शांतता समिती बैठकीत आवाहन 

प्रतिनिधी फैजपुर/रावेर मुबारक तडवी 

(संपादक:हेमकांत गायकवाड)

फैजपूर--प्रत्येक धर्माच्या भावनेची कदर करून एक दुसऱ्याचा धर्माचा आदर सन्मान करावा व सर्व धर्माचे लहान मोठे लोक  आपले प्रेम स्वभाव वर्तणूक आरास देखावा बघून गणेशोत्सवात सहभागी होण्याचा हेवा वाटावा  असा गणेशोत्सव थाटामाटातव साजरा करा असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज यांनी केले.

     ते सार्वजनिक गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त फैजपूर पोलिस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय भुसावळ रोड येथे काल गुरुवारी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हा पोलिस उपअधीक्षक अशोक नखाते होते.यावेळी ते बोलतांना म्हणाले हा भाग हिरवगार संपन्न आहे त्याचप्रमाणे येथील लोकांचे विचारही संपन्न आहे.लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सवाची सुरुवात केली तो उद्देश साध्य करावे तसेच पारंपरिक ढोलताशे वाद्यांचा वापर करून अतिशय सुंदर पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा व फैजपूर ची शांतताप्रिय परंपरा कायम ठेवावी असे आवाहन करून  कोणतीही घटना घडली नाही व कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी आम्हाला येण्याची गरज पडली नाही.याचं आंनद आहे.अशा शब्दांत फैजपूर शहराचे त्यांनी कौतुक केले.यानंतर फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी मनोगत करतांना शिस्तप्रिय माणसा सारखा असलेल्या फैजपूर शहराची शांतता प्रिय म्हणून ओळख आहे.तसेच उत्सव साजरा करतांनाच कालानुरूप उत्सवात बदल केले पाहिजे.असे सांगत नागरिकांनी नागरिक सुविधांविषयी समस्या मांडल्या त्याला उत्तर देत त्यांनी शहरातील खड्डे, स्ट्रीट लाईट,स्वच्छता ही कामे प्रशासक म्हणूनयुद्धपातळीवर मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी सर्वांनी गणेशोत्सव आनंदात व उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,भाजपा शहर अध्यक्ष अनिल (पिंटू) तेली, संजय सराफ यांनी मनोगत व्यक्त केले.तर उत्कृष्ट गणेश मंडळानां रामराज्य फाउंडेशन फैजपूर तर्फे तीन बक्षिसे देण्यात येणार आहे असे संजय सराफ यांनी तर मुस्लिम पंच कमिटी तर्फे तर्फे तीन बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शेख जलिल हाजी शेख सत्तार यांनी जाहीर केले.तसेच यावेळी फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या तर्फे फैजपूर पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस पाटील यांनी कोरोनाकाळा पासून आतापर्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे.त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष भास्करराव चौधरी, जेष्ठ नागरिक अब्दुल रउफ जनाब, वीज वितरण कंपनी चे फैजपूर शाखा कनिष्ठ अभियंता विनोद सरोदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद तर बैठकीला चंद्रशेखर चौधरी,माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,नितीन राणे,माजी नगरसेवक शेख जफर,अप्पा चौधरी,शेख जलिल हाजी सत्तार,पंडित कोल्हे,भाजपा शहर अध्यक्ष अनिल(पिंटू) तेली,भाजपा माजी शहर अध्यक्ष अनंता नेहेते,माजी नगरसेवक रशिद तडवी,शेख रियाज,देवेंद्र साळी,जितेंद्र भारंबे,डॉ दानिश शेख,वसीम शेख,शेख मुद्स्सर नजर,शेख आरिफ शेख कलिम,शेख एजाज,रामा होले,शेख आरिफ शेख रशिद,शाकिर शेख,शेख रियाज शेख बाबू, इमरान पटेल यांच्यासह शांतता समिती सदस्य फैजपूर पोलिस ठाणे अंतर्गत सर्वच गावातील पोलिस पाटील व गणेश मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणेश गुरव सर यांनी केले.आभार मलक आबीद सर यांनी मानले.यशस्वीतेसाठी गोपनीय पोलिस विजय चौधरी,राहुल चौधरी यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments