बदलापूर येथील २ चिमुकल्या शाळकरी मुलींवर लौंगिक अत्याचार करण्याऱ्या आरोपीला त्वरित फाशी द्या अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने ...
बदलापूर येथील २ चिमुकल्या शाळकरी मुलींवर लौंगिक अत्याचार करण्याऱ्या आरोपीला त्वरित फाशी द्या
अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन .
यावल (प्रतिनीधी )
(संपादक : हेमकांत गायकवाड)
बदलापूर येथील आदर्श विद्यालय कुलगाव बदलापूर जिल्हा ठाणे या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कायदेशीर तपास करून फाशी देण्यात यावी अशी मागणी अप्पर जिल्हा अधिकारी अंकुश पिनाटे यांना अखिल भारतीय पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली तर
जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक माध्यमिक व जिल्हा परिषद शाळा मध्ये ज्या शाळेत सिसी टीव्ही कॅमेरे नाही अशा शाळेत तातडीने सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे जेणे करून अशी कोणतीही घटना घडणार नाही . अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदनावर अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष डॉ शरीफ बागवान व जिल्हा सचिव शब्बीर खान यांच्या स्वाक्षऱ्या आहे ..


No comments