चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी व येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मा. आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख...
चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी व येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मा. आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
काल चोपडा विश्रामगृह येथे चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी व येणाऱ्या आडीअडचणी सोडवण्यासाठी मा. आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार साहेब यांच्या सोबत आढावा बैठक संपन्न
यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी त्यांच्या समस्या मांडल्या व मा. आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांच्या समस्यांवर त्वरित निराकारण करणेबाबत उपस्थित अधिकारी यांना सूचना दिल्या
यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार साहेब यांनी न्यूक्लीयर बजेट योजनां विषयी आदिवासी बांधवांना सविस्तर माहिती दिली व येणाऱ्या आपल्या सर्व अडचणी तात्काळ सोडवू असे आश्वासन दिले
यावेळी सोबत नरेंद्र पाटील सभापती,शिवराज पाटील, रावसाहेब पाटील, किरण देवराज, गोपाल पाटील, विकास पाटील, नितीन पाटील, कैलास बाविस्कर,कुणाल पाटील, अनु ठाकूर, नवल ठाकरे, संदीप सोनवणे,संजीव शिरसाठ, प्रताप पावरा सरपंच मेलाणे, दत्तर सिंग पवरा सरपंच वैजापूर, प्रल्हाद पदवी सरपंच देव्हारी, अनिल पावरा ग्रा. प. सदस्य मेलाणे, नामदेव बारेला, देवसिंग पावरा, गनदास बारेला, ताराचंद पाडवी, नकुल बारेला, लालू बारेला, सचिन पावरा, गजीराम पावरा, जगदीश बारेला, बिहारीं बारेला आदी आदिवासी बांधव उपस्थित होते.





No comments