Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा पालिका हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव:८ महिन्यांचा बाळं दगावला!

  सावदा पालिका हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव:८ महिन्यांचा बाळं दगावला! खाजगी दवाखान्यांत डेंग्यू,मलेरिया,टायफाईड डायरियाचे  रुग्ण घेत आहेत उप...

 सावदा पालिका हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव:८ महिन्यांचा बाळं दगावला!

खाजगी दवाखान्यांत डेंग्यू,मलेरिया,टायफाईड डायरियाचे  रुग्ण घेत आहेत उपचार"


प्रतिनिधी रावेर मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिका हद्दीत बुधवार पेठ येथील एका आठ महिन्यांचा बालकास डेंग्यूची लागण झाल्याने त्यावर सावदा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होता.परंतू सदर बालकाची तब्येत मध्ये सुधार होत नसल्या त्याला भुसावळ येथील दवाखान्यात दाखल केले असता येथे देखील त्याला बरे वाटत नसल्याकारणाने थेट सदर बालकास जळगाव येथे एका खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले असता येथे उपचारा सुरू असताना अखेर या बालकाची मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तसेच सावदा शहरात डेंग्यू, मलेरिया,तायफाईड,डायरिया,

चळ,उतरचा ताप इत्यादी गंभीर प्रकाराचे आजारांची लागण मोठ्या प्रमाणात अनेक लाहान मुले,तरुण तरुणी सह महिला पुरुषांना झाल्याने सदरील रुग्ण आपापल्या सोयीनुसार खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचेही समजते.

तरी शहरात होणारे असे गंभीर स्वरूपाचे आजारांचा प्रादुर्भावात वाढ होणे म्हणजे स्वच्छता बाबत दिलेल्या सर्व ठेके व त्या ठेकेदारांकडून कसोसीने शहर  स्वच्छतेची कामे घेण्यात संबंधित पालिका आरोग्य अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी का कमी पडत आहे?या अनुषंगाने थेट प्रांताधिकारी तथा न.पा.प्रशासकिय अधिकारी फैजपूर यांनी जातीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात अस्वच्छता बाबत लोकांमध्ये संताप व नाराजी

शहरातील सार्वजनिक गटारी,नाले सह महिला आणि पुरूषांच्या सौचालय,सार्वजनिक रस्ते आणि परिसरात जागोजागी नियमित व वेळेवर साफसफाई सह स्वच्छता ठेवण्यासाठीचा तसेच वेळेवर ओला सुका कचऱ्यांची उचल सह यावर घनकचरा प्रकल्पावरती नियमित प्रक्रिया करण्यासाठी ठेका घेणाऱ्यांकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते.वरील ठिकाणी असलेली अस्वच्छता व या कामात संबंधिताकडून होत असलेली दिरंगाई,मनमानी बाबत उद्भवलेली गंभीर आणि थेट शहरातील करदात्या जनतेच्या आरोग्यास हानिकारक ठरत असलेली बिकट स्थितीला घेऊन तसेच जंतू किटकनाशक फवारणीचा अभावला घेऊन नागरिकांमध्ये सावदा पालिका प्रशासना बाबत कमालीची नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

No comments