adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कुलभूषण पाटील सन्मानित मानवाधिकार सुरक्षा फोरम परिषदने केला

  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कुलभूषण पाटील सन्मानित           मानवाधिकार सुरक्षा फोरम परिषदने केला सन्मान.          रावेर प्रतिनी...

 राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कुलभूषण पाटील सन्मानित       

  मानवाधिकार सुरक्षा फोरम परिषदने केला सन्मान.    


     रावेर प्रतिनीधि मोहसीन मुबारक तडवी.   

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

         भारत सरकारच्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम या संस्थेद्वारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बु|| तालुका- रावेर येथील रहिवासी, हल्ली मुक्काम- मोठे वाघोदे, आणि चिनावल येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री कुलभुषण रघुनाथ पाटील सर यांना मान्यवरांच्या हस्ते क्षार श्रीफळ मानाचा फेटा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र आणि एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने परिवारासह सन्मानित करण्यात आले.

याआधी सुद्धा त्यांना 2019 यावर्षी मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेद्वारे राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अवघ्या १५ वर्षांच्या सेवेत त्यांना मिळालेला हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments