पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपणाचा आगळावेगळा कार्यक्रम. चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड ...
पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपणाचा आगळावेगळा कार्यक्रम.
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड दिनांक.४/१०/२०२० रोजी श्री. कै. अण्णासो निळकंठराव आनंदराव सोनवणे हातेड. (माजी संचालक ज .जि. मराठा विद्याप्रसारक समाज जळगाव. )
माजी चेअरमन श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हातेड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ४ थ्या स्मृतीदिनाच्या स्मरणार्थ १७५ आम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातेड येथे संपन्न झाला. कार्यक्रमास माजी शिक्षक आमदार तात्यासो दिलीपराव सो, प्रा. चंद्रकांत सनेर, माजी जि. प सदस्य गजेंद्र सोनवणे व माजी मुख्या चंद्रकांत सोनवणे, आश्रमशाळेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे.चोपडा ता. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे. पशुवैद्य किय अधिकारी डॉ कनके व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ होते .त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा व त्यांच्या कार्याचा गौरव केला . ते सेवानिवृत्त शिक्षक अशोक निळकंठ सोनवणे व निवृत्त उच्च सहाय्यक श्री जयवंत निळकंठ सोनवणे यांचे वडील होते.या कार्यक्रमातून एक नवा संदेश समाजाला दिला .
No comments