खडसे महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनीषा गरुडे हिची विद्यापीठ संघात निवड मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक :- हेमकांत गायकवाड) मुक्...
खडसे महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनीषा गरुडे हिची विद्यापीठ संघात निवड
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :-मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी .खडसे महाविद्यालयाची खेळाडू मनीषा गरुडे हिची आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
सदर क्रॉस कंट्री स्पर्धा मंगलोर विद्यापीठ मंगला गंगोत्री ,कर्नाटक येथे दिनांक 18 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान संपन्न होणार आहेत .त्यासाठी आज विद्यापीठाचा संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला .
सतत दुसऱ्या वर्षी मनीषा हिची क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली. तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा एडवोकेट सौ .रोहिणी ताई खडसे -खेवलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मनीषा हिला क्रीडा संचालक डॉ.प्रतिभा ढाके यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी, सचिव डॉक्टर सी. एस .दादा चौधरी,प्राचार्य डॉ.एच. ए .महाजन, उपप्राचार्य ए. पी. पाटील, सर्व प्राध्यापक वृंदा ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments