वाशीम मंगळूरपिर विधानसभेमध्ये यंदा शिट्टीच वाजणार... वाशीम प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) वाशिम येथील बहुजन भारत पार्टीचे वा...
वाशीम मंगळूरपिर विधानसभेमध्ये यंदा शिट्टीच वाजणार...
वाशीम प्रतिनिधी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
वाशिम येथील बहुजन भारत पार्टीचे वाशीम मंगरूळपीर विधानसभेचे अधिकृत उमेदवार जगदीश मानवतकर यांचा धडाकेबाज दौरा वाशिम मंगरूळपीर विधानसभेमध्ये यंदा सुरू आहे. जगदीश मानवतकर यांनी वाशीम मंगरूळपीर विधानसभेतील बऱ्याच गावांना स्वतः भेटी देऊन मतदारांना यावेळेस मला विधानसभेत जाण्याची संधी द्या असे आव्हान मतदारांना केले आहे. मातंग समाजाचे उमेदवार जगदीश मानवतकर हे गेल्या 10 ते 15 वर्षापासून वाशीम मंगरूळपीर मध्ये जनसामान्याचे कामे करीत आहेत .
वाशिम मंगरूळपीर मध्ये कोरोनाच्या काळात त्यांनी बऱ्याच मंजूर आणि कामगारांना मदतीचा हात दिला होता. त्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना योद्धा म्हणून ओळखले जातात. जगदीश मानवतकर हे शिव - लहू - फुले - शाहू - आंबेडकर- साठे यांच्या विचाराचे पाईक असून ते बहुजन चळवळीमध्ये दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत . वाशिम मध्ये शिवजयंती, भीम जयंती, लहु जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन ते रक्तदानांमध्ये ते मदत करीत असतात.
त्याचबरोबर कुठेही महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्यांना मोफत रुग्णसेवा त्यामध्ये रक्त, निधी त्याचबरोबर अनेक रुग्णांना ते स्वतः भेटून मदतीचा हात देत असतात . जगदीश मानवतकर यांनी अनेक समाजाला न्याय मिळवून दिला आहे. उपोषणामध्ये बसलेल्या उपोषण करताना भेटून ते त्यांचे उपोषण कसे मार्गी लागेल याकरिता मदत करीत असतात. अनेक मोर्चे , अनेक आंदोलने आणि अनेक सभेचं त्यांनी आयोजन वाशीम मंगरूळपीर विधानसभेमध्ये केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे , शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत आणि शासन दरबारी शेतकऱ्यांची मागणी मांडली आहे. अतिक्रमण , घरकुल, गावठाण, जमीन याकरिता त्यांनी आंदोलने केली असून अतिक्रमण धारकांना हक्काची जागा मिळावी याकरिता ते आंदोलने करीत असतात .
बहुजन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत .त्यामध्ये त्यांना अटक सुद्धा झालेली आहे. मातंग समाजासह सर्वच समाज बांधवांचे त्यांनी सेवा केली आहे . त्यामुळे आता त्यांना विधानसभेत पाठवा अशी विनंती जगदीश मानवतकर यांनी वाशिम मंगरूळपीर मतदारसंघातील मतदारांना केली आहे आणि अनेक गावात चांगला प्रतिसाद मिळत आहे.बहुजन भारत पार्टीचे ते सक्रिय कार्यकर्ते असून बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.वेंकटेश कसबे साहेब यांनी त्यांना त्यांचे कार्य बघून ही उमेदवारी दिली आहे . तरी प्राध्यापक व्यंकटेश कसबे साहेब यांनी मतदारांना आवाहन केला आहे की , वाशिम मंगळूरपिर विधानसभेतील मतदारांनी जगदीश मानवतकर यांना यावेळेस संधी द्या. ते तुम्ही दिलेल्या संधीच नक्की सोनं करतील. अशी विनंती वेंकटेश कसबे साहेब यांनी मतदारांना केली आहे. तरी सर्व गावांमध्ये यंदा शिट्टीच वाजणार असे वाशिम मंगरूळपीर मधील नागरिकांमधून ऐकण्यास येत आहे.




No comments