महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्ज माफी लाडकी बहीणसाठी ३ हजार रुपये महिना : उध्दव ठाकरे, उबाठा उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे ...
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्ज माफी लाडकी बहीणसाठी ३ हजार रुपये महिना : उध्दव ठाकरे, उबाठा
उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना निवडून आणण्याचे आवाहन
चोपडा दि.११(प्रतिनिधी)फुकटचे पंधराशे रुपये तुम्हाला हवे आहेत की स्वतःच्या हिंमतीवर तुमच्या मुलीने कमावलेला एक रुपया तुम्हाला हवा आहे असा प्रश्न करीत.पंधराशे रुपये घेऊन मुलगी घरी बसवायची नाही तर तिला सक्षम करायचं आहे . शिवाय शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व कर्जमाफीही आम्ही देणार आहोत त्यासाठी तुम्ही मविआ आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन उबाठा पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आयोजित जाहीर सभेतून केले.
चोपड्याला लाखोंचा निधी आल्याने रस्ते आरशासारखी झालेली असावीत असे मला वाटले होते मात्र प्रत्यक्षात खुळखुळे झाले असल्याचा अनुभव आल्याने मानेला पट्टा लावावा लागेल की काय अशी भिती आल्याचा मिश्किल टोला लगावत मिंधे पार्टीवर भरवसा न ठेवता आपले जनहिताचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन केले.यावेळी माघार घेतलेले उमेदवार राजू तडवी यांना शब्दाला मान देणाऱ्या व्यक्तीची उपमा देत आभार व्यक्त केले शिवाय अपक्ष उमेदवार बाळू कोळी यांना उबाठा उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी धन्यवाद दिलेत.
महिलांना तीन हजार रुपये महिना , मोफत शिक्षण शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन आदी पिकांना चांगला भाव देण्याचा आमचा अजेंडा असून आपल्याला आपल्या मदतीने महाराष्ट्र हा सक्षम बनवायचा आहे असे आवाहनही त्यांनी केले.मी सभे संदर्भात जिथे जिथे गेलो तिथले मतदार राजा एकच हाक की, ह्या गद्दाराना गाडा असेच सांगत असतात यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व मिध्या गटातील उमेदवाराचे गुवाहाटी चे तिकीट काडून ठेवा आणि 23 तारखेला निकाल लागल्या नंतर 24 तारखेला यांना वाजत गाजत गुवाहाटीला पाठवा म्हणजे यांना कळेल की, फुटून गेल्यावर काय होते.अश्या अनेक टीका स्थानिक उमेदवारावर व राज्य शासनावर केल्या
(एकेकाळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या पराभव करून कैलास बापू पाटील हे निवडून आले होते. मध्यंतनरी बापू ही लांब चालले गेले होते परंतु आज दोघेही एकाच स्टेज वर असल्याने मधून स्फूर्ती तयार होते आणि येथे आल्या वर वातावरण वेगळंच असल्याने प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा विजय आजच दिसत आहे.)
यावेळी व्यासपीठावर माजी विधानसभा सभापती अरुण भाई गुजराती, माजी आमदार कैलास बापू पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील, विष्णू भंगाळे, डॉक्टर मानवतकर, उभाटा उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी प.स.उपसभापती गोपाळ सोनवणे,पक्ष संपर्क प्रमुख संजय सावंत, विजय परब, श्री.राणे,जळगाव शहर उबाठाचे उमेदवार सौ.जयश्री महाजन चोसाका चेअरमन चंद्रहास भाई गुजराती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरख तात्या पाटील, घनशाम पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला, डॉ. महेंद्र पाटील ,इंदिरा ताई पाटील, रोहिणी पाटील, शशिकांत देवरे , शशिकांत पाटील, विजयाताई पाटील, जीवन भाऊ चौधरी , माजी नगराध्यक्षा मनीषा ताई चौधरी ,प्रतिभा शिंदे, माजी आमदार दिलीप सोनवणे, राजु तडवी, सुनील बुरुड,हुसेन का पठाण खा, गोकुळ आबा पाटील, देवेंद्र सोनवणे, शशिकांत कन्हैया ,महेंद्र भोई ,नंदकिशोर सांगोरे ,सुरेश सिताराम पाटील, वाजाहत अली काजी, भाईदास कोळी आदी उपस्थित होते.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments