चोपड्यातील बंडखोर व 'सिझनेबल' पुढाऱ्यांना अद्दल घडवा - स्वप्निल सोनवणे ( पाच वर्षे मतदारसंघात विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारा...
चोपड्यातील बंडखोर व 'सिझनेबल' पुढाऱ्यांना अद्दल घडवा - स्वप्निल सोनवणे
( पाच वर्षे मतदारसंघात विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराचाच विचार व्हावा )
जळगाव प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा : चोपडा विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून सोनवणे यांना मतदारसंघातून मिळणारा भरघोस पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसत आहे. आपल्या भक्कम अशा विकासकामांच्या जोरावर चंद्रकात सोनवणे हे यंदाच्या निवडणूकीत हॕट्रिक साधून विजयश्री खेचून आणतील, असे प्रतिपादन, युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी केले आहे.
'विकास हाच धर्म अन् विकास हीच जात' असे मानत गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात शिवसेनेचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी चोपडा मतदारसंघात भरीव कामगिरी विकासकामे केलेली आहे. मतदारसंघातील रस्ते असो वा पाण्याचा प्रश्न असो, सोनवणे यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन या सर्वच समस्यांचे निराकरण केलेले आहे. सोनवणे यांच्या कारकीर्दीत चोपडा बसस्थानक स्वच्छतेच्या बाबतीत राज्यातून प्रथम आलेले असून चोपडा व जळगाव तालुक्याला जोडणारा तथा मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांचे अंतर कमी करणारा खेडीभोकरी-भोकर पुलाचे अत्यंत महत्त्वाचे कामही गुलाबरावांच्या साथीने घडवून आणत जळगाव व चोपडा अशा दोन्हीही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला सुखावले आहे. वैद्यकीय,तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन क्षेत्रतील विकास, विविध समाजांसाठी सामाजिक सभागृहे, बौद्ध विहार तथा शादीखाना,पाडळसे धरणासाठीचे शर्थीचे प्रयत्न, तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विकासासह तफा अशी अनेक भरभक्कम कामे सोनवणे यांनी आपल्या चोपडा मतदार संघात केलेली असून यामुळे विरोधकांची झोप उडालेली आहे.
दुसरीकडे चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधात चोपडा मतदारसंघात उमेदवार देताना विरोधकांना दुसऱ्या पक्षातून आयात केलेले पार्सल आणावे लागलेले आहे. मात्र खुर्चीच्या मोहापायी महायुतीतून बंडखोरी करणाऱ्या असल्या उमेदावाराची बंडखोरी चोपडा तालुक्यातील शिवसैनिक जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नसल्याचेही यावेळी स्वप्निल सोनवणे यांनी सांगितले.
चंद्रकांत सोनवणे हे रात्रंदिवस मतदारसंघात सदैव सक्रिय असताना, विकासकामे करत असताना, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सदैव सामील होत असतानाच त्यांच्या समोरील प्रतिस्पर्धी उमेदवार मात्र या मतदारसंघात कधी फिरकलेले सुद्धा नाहीये. यामुळेच अचानक निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात कधीच न दिसणाऱ्या व 'सिझनेबल पुढारी' बनलेल्या या उमेदवाराला मतदारसंघातील जनतेने का संधी द्यावी ? हाही मोठा प्रश्न स्वप्निल सोनवणे यांनी यावेळी मतदारराजाला विचारला.
चंद्रकात सोनवणे तसेच लताताई सोनवणे यांनी आपल्या कारकीर्दीत विधानसभा क्षेत्रात जे ऐतिहासिक कामे केलेले आहेत त्यामुळे चोपडा व यावल तालुक्यात त्यांची 'विकासपुरुष' म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. त्यांच्यासोबतच त्यांची मुलंही या मतदारसंघात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून प्रत्येकाला 'गौरव' वाटेल अशा 'अमृता'त्मक विकासकामांचा महासेतू या परिवाराने चोपडा मतदारसंघात प्रस्थापित केलेला आहे.
याउलट प्रतिस्पर्धी उमेदवार हे मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'गुडघ्याला बाशिंग बांधून' धुमकेतूसारखे उगवले आहेत. सदरील उमेदवार हे जळगाव तालुक्यातील कानळदा-भोकर गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य असून यांनी निवडून आल्यावर देखील या गटात पाच वर्षात एकदाही आपला चेहरा दाखविलेला नाही. यामुळेच जि.प. गट निवडूनही सांभाळता न आल्यामुळे एवढा मोठा चोपडा मतदारसंघ सांभाळण्याच्या 'गप्पा' मारणे म्हणजे 'एक ना धड भाराभर चिंध्या' असून आता विरोधकांनी एकवटून कितीही गणिमी कावे केले, कटकारस्थान केले तरी आपल्या विकासकामांच्या जोरावर 'विकासपुरूष' चंद्रकांत सोनवणे यांच्यामागे सर्वसामान्य मतदारराजा खंबीरपणे उभा असून विधानसभेच्या आखाड्यात बंडखोर प्रतिस्पर्धीला चंद्रकात सोनवणे हे चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाहीत, यात शंका नसल्याचे प्रतिपादन युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी केले.
- स्वप्निल सोनवणे, युवासेना जळगाव
( मो. 9090807171 )

No comments