जनता माझ्या पाठीशी :- हाजी मुश्ताक शब्बीर खान यावल (प्रतिनीधी ) संपादक हेमकांत गायकवाड रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील आजाद समाजपार्ट...
जनता माझ्या पाठीशी :- हाजी मुश्ताक
शब्बीर खान यावल (प्रतिनीधी )
संपादक हेमकांत गायकवाड
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील आजाद समाजपार्टीचे उमेदवार हाजी मुश्ताक हे प्रचार व मतदार भेटी ,ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आहेत आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि मी ज्या ज्या गावांमध्ये प्रचारासाठी जात आहे, त्या त्या ठिकाणी युवक, माता-भगिनी, तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत असताना, मला प्रकर्षाने जाणवले की, आमच्या मतदारसंघाचा विकास गेल्या पाच वर्षांत हरवून गेला आहे. तो नेमका कुठे गेला, हेच समजत नाही. गेल्यावेळी केलेली चूक या निवडणुकीत दुरुस्त करण्याची जनतेची तयारी आहे, तसेच रावेर यावल मतदार संघात माझ्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत यामुळे मला खात्री आहे की जनता माझ्या पाठीशी आहे असे मत आजाद समाजपार्टीचे उमेदवार हाजी मुश्ताक यानी व्यक्त केले" यावल तालुक्यातील अंजाळे, टाकरखेडा, वाघळूद, चिखली, बोरावलं, भालशिव, पिप्री, निमगाव, राजोरा आणि रावेर तालुक्यातील रसलपूर, भातखेडा, रमजीपूर, खिरोदा प्रगणे रावेर, बक्षीपूर आदी गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार केला.

No comments