चोपडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या ध्येय धोरणाच्या मर्यादा ओलांडून निर्णय घ्यावा लागला. - शुभम सोनवणे, माजी शहराध्यक्ष, रा...
चोपडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या ध्येय धोरणाच्या मर्यादा ओलांडून निर्णय घ्यावा लागला. - शुभम सोनवणे, माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,चोपडा
शुभम सोनवणे, माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,चोपडा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील बहुतांश मतदारसंघात अधिकृत पक्षाने दिलेल्या उमेदवारांबद्दल घटक पक्षांमध्ये बऱ्याच मतदारसंघातून नाराजीचा सूर पाहण्यात आला. परिणामी, बऱ्याच मतदारसंघातून नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता योग्य अशा उमेदवाराची पर्यायाने पक्षाची साथ धरली. काही ठिकाणी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी लढत बंडखोरी देखील केली. हे चित्र संपूर्ण राज्यातून पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजितदादा गट ) चे माजी पदाधिकारी श्री. शुभम सोनवणे यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.प्रभाकर गोटू सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. सदर बाबीची त्यांना विचारणा करण्यात आली असता, मतदारसंघातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, बहुसंख्य कार्यकर्ते व मतदारांमधून तालुक्याला नवीन हक्काचे नेतृत्व तयार करण्याचा आवाज, सामाजिक कौल व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी सदर निर्णय घ्यावा लागला असल्याची बाब श्री.शुभम सोनवणे यांनी लक्षात आणून दिली.
शुभम सोनवणे हे आदिवासी कोळी समाजाचे राज्याचे अभ्यासक व संघटक असल्यामुळे चोपडा तालुक्यातील आमने सामने उभे असलेले कोळी समाजाचे दोघे उमेदवारांपैकी योग्य अशा उमेदवाराची निवड करताना राज्याच्या प्रमुख अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी कळविले. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या अमळनेर मतदारसंघात शुभम सोनवणे यांनी महायुतीचे उमेदवार श्री. अनिल भाईदास पाटील यांना समर्थन व जाहीर पाठिंबा देऊन महायुती व महाविकास आघाडी पेक्षा दोघे मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भावनांना आदर देत योग्य तो निर्णय घेतला असल्याचे कळविले. पण या सर्व घडामोडीत पक्षामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना ही बाब लक्षात आणून देऊन कार्य करत असल्याचे त्यांनी कळविले.
No comments