adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अध्यात्माची आणि भक्ती भावाची आवड निर्माण करणे हे काळाची गरज :-- ललित फिरके

  अध्यात्माची आणि भक्ती भावाची आवड निर्माण करणे हे काळाची गरज  :-- ललित फिरके   ईदू पिंजारी फैजपूर (संपादक :- हेमकांत गायकवाड)   फैजपूर - न...

 अध्यात्माची आणि भक्ती भावाची आवड निर्माण करणे हे काळाची गरज  :-- ललित फिरके  


ईदू पिंजारी फैजपूर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर - न्हावी येथील संत  सेवा मंडळांने सलग  २१ वर्षापासून परिसरात सुरू केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्या मनामध्ये  अध्यात्माची आणि भक्ती भाव बद्दलची आवड निर्माण करणे ही काळाची गरज आहे.आज उपस्थित विद्यार्थी-  विद्यार्थिनी हा भविष्यातील भाविक तसेच सुसंस्कृत नागरिक बनण्याची अपेक्षा करणे हा होय आणि हे कार्य संत सेवा मंडळ गेल्या २१ वर्षापासून अविरतपणे करीत आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित फिरके  यांनी केले.

महिनाभरापासून सुरू असलेल्या कार्तिक स्नान काकड आरती  सोहळा सांगता समारंभाच्या अध्यक्षीय स्थानावरून सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित फिरके बोलत होते. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे खंडोबा देवस्थान मंदिराच्या आवारात पार पडला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाचेअरमन सुधाकर चौधरी, विशाल महाजन, पंडित चोपडे, मोहन धनगर व मान्यवर उपस्थित होते. महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात कार्तिक दिंडीच्या ग्राम प्रदक्षिणेसाठी अनेक शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत असतात.या वर्षी जवळपास ३५ विद्यार्थी व ५२ विद्यार्थिनी मिळून  ८७  बाल टाळकरी सहभागी झाले होते.  प्रत्येक सहभागी होणाऱ्या टाळकऱ्यास संत सेवा मंडळाकडून बालपेन, हरिपाठ, वारकरी जीवन संध्या, काकड आरती भजन मालिका, पंचरत्न गीता,ज्ञानेश्वरी या प्रकारचे ग्रंथ प्रदक्षिणेसाठी येण्याच्या उपस्थितीनुसार भेट म्हणून देण्यात येतात.बाल वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी देणगी स्वरूपात मोहन ज्ञानदेव धनगर, दीपक श्रीधर पाटील (आळंदी देवाची) व पंडित चुडामन चोपडे, खुशाल नथू महाजन, तुळशीराम रामा फेगडे, सुधाकर गिरीधर चौधरी, दामोदर भास्कर जगताप या दात्यांनी सरळ हाताने मदत केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत सेवा मंडळाचे पदाधिकारी खुशाल महाजन ,मोहन धनगर ,पंडित चोपडे व चंद्रकांत गाजरे यांनी सहकार्य केले.

सर्व विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र डोंगरदे येथील श्री पंत मंदिर जागरूक देवस्थान येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची अध्यात्मिक सहल  आयोजित करण्यात येऊन त्या ठिकाणी सर्व उपस्थितांना देवस्थानचे गुरुवर्य महाराज यांचे आशीर्वाद पर भाषण व तेथील स्थानाचे महत्त्व पटवून दिले

No comments