adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गांजा तस्करांची कमालच झाली एस.टी.बस.मधुन वाहतूक केली

 गांजा तस्करांची कमालच झाली एस.टी.बस.मधुन वाहतूक केली  वैजापूर नाक्यावर तस्करी करतांना अटक झाली चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) ...

 गांजा तस्करांची कमालच झाली एस.टी.बस.मधुन वाहतूक केली 

वैजापूर नाक्यावर तस्करी करतांना अटक झाली


चोपडा प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एस एस टी पॉईंट वैजापुर येथे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करते वेळी चोपडा आगाराची बस क्र.एमएच-१४- बिटी-१३२३ धवली-चोपडा या बसची तपासणी केली असता सर्वात शेवटी मागच्या सीटवर बसलेल्या व्यंक्तीकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली असता एका बॅगेत अम्ली पदार्थ (गांजा) मिळून आला. संशयीत इसमास मुदेदमालासह ताब्यात घेवून चौकशी केली असता ९.५०० किलो ग्रॅम माल किंमत १,९०,०००/- (एक लाख नव्वद हजार रुपये) एवढा किंमतीचा गांजा मिळून आला. असून याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक ११/११/२०२४ रोजी सकाळी ११.४५ वा चे सुमारास इसम नामे सवीन चंपालाल बारेला वय २३ रा. खट्टी गेरुघाटी, ता. वरला, जिल्हा बडवाणी, राज्य मध्यप्रदेश हा आपले ताब्यातील १) १. १,९०,०००/- रु कि. चा ओलसर हिरवट रंगाचा फुले, बिया, पाकळी असलेला गांजा एस टी बस क्रमांक एम एच १४ बी टी १३२३ इसम नामे सविन चंपालाल बारेला याचे ताब्यात मिळून आलेला त्याचे वजन इलेक्ट्रॉनिक वजनकाटा अरुण दयाल पटेल याचे करवी केले असता त्याचे प्रमाणीत वजन ९ किलो ५०० ग्रॅम एवढे असलेला व प्रती किलो २०,०००/- रुपये प्रमाणे. २). ००.००/- रु.कि.चे एकुण मिळुन आलेल्या ९ किलो ५०० ग्रॅम वजनाचे गांजा मधुन तीन कागदी पाकिटात प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचा गांजा सॅम्पल काडुन ते रासायनिक विश्लेषणासाठी, मा. न्यायालयाचे कामकाजासाठी व एक पो स्टे रेकॉर्डवर ठेवण्यासाठी पो स्टे चे सिलने लाख मोहर लावुन सिलबंद केले तर पोहकॉं/ फिरोज इस्माईल तडवी वय ४५ वर्षे, अडावद पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून CCTNS गुर.न. २२५/२०२४ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे अधिनियम १९८५ चे कलम २०(ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मा कावेरी कमलाकर प्रभारी चोपडा ग्रामीण पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे 

No comments