शिरपूर येथे सात दिवसीय श्री शिवमहापुरान कथेचे आयोजन कथेमध्ये लाखो भाविकांची गर्दी शिरपुर प्रतिनिधी :- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर...
शिरपूर येथे सात दिवसीय श्री शिवमहापुरान कथेचे आयोजन कथेमध्ये लाखो भाविकांची गर्दी
शिरपुर प्रतिनिधी :-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर (धुळे) - धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथेचे भव्य आणि दिव्य अशा ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. १ डिसेंबरपासून या कथेला सुरुवात झाली असून येत्या ७ डिसेंबरपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान, याठिकाणी पहिल्या दिवसापासूनच
कथेला भाविकाचा प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. १ ते ७ डिसेंबरदरम्यान, दररोज दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील करवंद रोडवरील भगवान महावीर जैन उद्यानाच्या जागेवर हे भव्य असे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आता पर्यंत कथेला चार दिवस झाले असून चारही दिवस याठिकाणी भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये भाविकांची सर्व सोय करण्यात आली आहे.
शिवमहापुरान कथेचे आयोजकाचे (पाटील परीवार) भाविकांकडून आभार
शिरपूर शहरात शिवमहापुरान कथेत येणाऱ्या भाविकांकडून पाटील परिवाराचे भाविकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. शहरात पहिल्याच कथेचे आयोजन असुन, यात आयोजकांकडून भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्यात आले आहे. भाविकांना पाण्याची सोय, सकाळी चहा, नाश्ता व जेवणाची सोय निरंतर उपलब्ध केली आहे. म्हणून येणाऱ्या भाविकांकडून पाटील परिवाराचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
शिवमहापुरान कथेमध्ये महाप्रसादाचे आयोजन
सात दिवसीय शिवमहापुरान कथेमध्ये पहिल्याच दिवसापासून भाविकांसाठी भंडारा चे आयोजन करण्यात आले आहे. दानशूर भाविकांकडून कार्यक्रमांसाठी दररोज गुप्त दान करण्यात येत आहे. भाविकांसाठी सात दिवसीय निरंतर २४ तास भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
शहरातील महावीर उद्यानात सुरु असलेल्या शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांची दागिने, मोबाईल, रोकड चोरी करणाऱ्या दोन पुरुष व आठ महिला यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्या विरुद्ध तहसीलदारांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. दि. १ डिसेंबर रोजी काही भाविकांचे रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी शहर पोलिसांकडे प्राप्त झाल्या. प्रभारी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अशा चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
No comments