Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज.

  अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दिनांक-३१ डिसेंबर २०२४ पासुन...

 अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज.


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

आज दिनांक-३१ डिसेंबर २०२४ पासुन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री उनपदेव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिनांक-३१डिसेंबर२०२४ ते जानेवारी२०२५ पर्यंत यात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची काळजी घेतली जावी


या उद्देशाने.. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार... 
तालुका आरोग्य अधिकारी-डॉ. प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली...  प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथील वैद्यकीय अधिकारी-डॉ.पवन सुशिर, डॉ. अर्चना पाटील यांच्या सयुक्तिक रित्या आरोग्य कर्मचारी वर्ग व वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी यांचे पथक तैनात करण्यात आलेले आहे. त्या उद्देशाने प्रसंगी आज आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, संतोष भांडवलकर, आर.एस. पाटील यांचे मार्फत विविध ठिकाणी जाऊन पिण्याच्या पाण्याची टाकीत OT टेस्ट घेण्यात आली, ot नसलेल्या ठिकाणी स्वतः त्यांनी TCL पावडर टाकुन शुद्धीकरण करून घेतले, व सदरच्या वेळी दररोजच्या पाणी शुद्धीकरण करणे कामी... वनरक्षक दशरथ पाटिल, संजय बेलदार, शांताराम कोळी व इतर कर्मचारी वर्ग यांना TCL पावडरचे मदर सोल्युशन कसे तयार करण्यात येते याबाबत प्रात्यक्षिक द्वारा.. आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी प्रशिक्षण दिले.. आणि मदर सोल्युशन तयार करून दिले.

No comments