आ.अमोल जावळे यांनी निमगाव गोतीर्थाला भेट देऊन केले गोपूजन यावल (प्रतिनीधी ) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील गोध गोवर्धन गोश...
आ.अमोल जावळे यांनी निमगाव गोतीर्थाला भेट देऊन केले गोपूजन
यावल (प्रतिनीधी )
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील गोध गोवर्धन गोशाळा निमगाव येथे आमदार अमोल जावळे यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी आमदार अमोल . जावळे यांनी गोमातेचे विधिवत पूजा करून गाईंना गोग्रास खाऊ घातला. गोमातेचा जतन ,रक्षण व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होते अशा प्रकारचे प्रतिपादनद आमदार अमोल जावळे यांनी केले व गोसंवर्धन व रक्षणाची शाश्वती दिली. तसेच गोशाळेतील गाईंच्या सेवेचे व संगोपनाचे विशेष कौतुक केले.
या भेटीदरम्यान गोशाळेचे अध्यक्ष गोपाळ कोळी, उपाध्यक्ष अरुण तावडे ,सचिव चेतना कोळी ,सदस्य बाळू कोळी,लिलाबाई कोळी, विजया तावडे ,सुरज सोनवणे ,सुरज राजपूत संचित कोळी महाराज, संजय तावडे, जगदीश कोळी ,भोजराज ढाके, साई चव्हाण ,यश वारके, विनायक बारी, पंकज चौधरी, अभिषेक सोनवणे, कृष्णा पाटील, गिरीश बारी, प्रकाश कोळी ,सविता कोळी, छाया पाटील, अलका कोळी, कल्पना पाटील व सर्व ग्रामस्थ निमगाव व टेंभी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार डॉ नरेंद्र महाले यांनी मानले.
No comments