adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगरात वारकरी व हिंदू का झाले संतप्त ?

  मुक्ताईनगरात वारकरी व हिंदू का झाले  संतप्त ? मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड  (संपादक -:- हेमकांत गायकवाड ) आदिशक्ती संत मुक्ताई साहेबा...

 मुक्ताईनगरात वारकरी व हिंदू का झाले 

संतप्त ?


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड )

आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांच्या पद स्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणजेच मुक्ताईनगर येथे दर पंधरवाडी एकादशी सह हजारो वारकरी शुध्द शाकाहारी समजाला जाणारा संप्रदाय टाळ मृदुंग घेवून पायी दिंडी तसेच वारी स्वरूपात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तीर्थक्षेत्र असलेल्या संत भूमीत नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उघड्यावरील मांस व मासे विक्रीला सामोरे जावे लागते. बुऱ्हाणपूर रोडवरील तसेच जुनेगाव रोडवरील उघड्यावरील मांस व मासे विक्री ही वारकऱ्यांचीच नव्हे तर शालेय किशोरवयीन विद्यार्थ्यांची देखील डोके दुखी ठरलेली आहे.


जूनेगावं आठवडे बाजारात लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र कत्तलखाना बांधलेला असताना मासे मांस विक्रेते विना परवनगी मनमानी करून उघड्यावर कत्तलखाने थाटून लोक भावनांशी खेळण्याचा संतापजनक प्रकार करीत असतात आणि विशेष म्हणजे एकादशी देखील खुलेआम उघड्यावरील मांस विक्री सुरू असते. विशेष म्हणजे उघड्यावरील मांस विक्री संदर्भात कायदा असल्यावरही नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने वारंवार निवेदन देवूनही कारवाई होत नसल्याने संबंधित तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे.

यावेळी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जूने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख संजनाताई पाटील , महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना पालवे , किर्तनकार दुर्गाताई संतोष मराठे, नगरसेविका सविताताई भलभले , रामरोटी आश्रमचे किशोर गावंडे, किरण महाजन ,विशाल सापधरे,सचिन जैन , बाळा चिंचोले, निलेश सावळे, सचिन हिवराळे तसेच विविध हिंदू संघटना, दुर्गा मंडळे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments