गलंगी ते चोपडा पर्यंतच्या रस्त्याची डागडुजी फक्त नावालाच का ? सुज्ञ नागरिकांसह वाहनधारकांचा राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी.ई विभागाला सवाल (मच्...
गलंगी ते चोपडा पर्यंतच्या रस्त्याची डागडुजी फक्त नावालाच का ?
सुज्ञ नागरिकांसह वाहनधारकांचा राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी.ई विभागाला सवाल
(मच्छिंद्र कोळी गलंगी ता.चोपडा प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंकलेश्वर -बुऱ्हाणपूर या महामार्गावरील गलंगी तालुका चोपडा, हा रस्ता गलंगी (अनेर) ते चोपडा पर्यंत अत्यंतदयनीय अवस्था झाली असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष देण्याचे बंद केले की काय? असा प्रश्न सामान्य जनता व वाहनधारक यांना पडलेला आहे काही दिवसापूर्वीच रस्त्यावर खड्डयांची डागडुजी करण्यात आली होती.
ती पण एक खड्डा बुजवून, दहा खड्डे सोडण्यात आले असल्याचे तर मध्यंतरीच्या काळात तर खड्डे बुजविणारे गायबच कि काय मग हा नेमका प्रकार काय? असा प्रश्नही सुजाण नागरिकांन कडून बोलले जात आहे मागे हि या खड्डयांमुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत असुन आज रात्री गलंगी गावाजवळ खड्डा टाळण्यासाठी ट्रकचालकाने प्रयत्न केला पण खड्डा टाळतांना ट्रकने पलटी घेतली गाडी नंबर (आर जे २० बी ३२३९) हा ट्रक बेंगलोर ते जयपूर, राजस्थान येथे शेतमाल अद्रक भरून जात असताना पलटी झाला या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली तर अशीच एक घटना पुनःश्च पहाटे पहाटे ०४:०० ते०५:०० वाजे दरम्यान खड्डे चुकवितांना होंडा कंपनीची (आर जे २० सि ई १८४०) ही गाडी वाहनचालक व त्यात आपले कुटुंब घेऊन जात असताना खड्डे चुकत असताना पलटी झालेली ट्रक मध्ये घुसून गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशा चुराडा झाला तर त्यांचे नशीब चांगले की काही महिला व बालक यांना किरकोळ दुखापत झाली व ते पण सुदैवाने वाचले जीवितहानी झाली नाही तरी ट्रक व होंडा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे बुऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील गलंगी ते चोपडा पर्यंतचे सर्वच खड्डे डागडुजी झाली की काय? का फक्त कागदावरती दाखवून ठेकेदाराने हात उंच केले असाही वाहनधारकांकडून सुर निघताना दिसून येत आहे तसेच असेल तर बांधकाम विभाग चे लक्ष तरी कुठे? गलंगी ते चोपडा पर्यंत जाणे म्हणजेच तारेवरची कसरतच करून ,जीव मुठीत धरूनच प्रवास करणे तरी या गंभीर समस्या कडे कोणचे लक्ष जाईल का? असाही मनःस्तापासह तालुक्यातील सामान्य जनतेच्या व वाहनधारकांच्या संतापाच्या भावना उमटताना दिसून येत आहेत.


No comments