झुरखेडा ता.धरणगाव येथे प.पू. धिरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज (बागेश्वरधाम सरकार) यांच्या अमृतवाणीतून हनुमंत कथेचे आयोजन धरणगाव प्रतिनिधी संप...
झुरखेडा ता.धरणगाव येथे प.पू. धिरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज (बागेश्वरधाम सरकार) यांच्या अमृतवाणीतून हनुमंत कथेचे आयोजन
धरणगाव प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
परिसरातील धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे श्री स्वयंभू चैतन्य राम ट्रस्ट तसेच झुरखेडा व परिसरातील ग्रामस्थ यांच्यावतीने प.पू गुरुदेव श्री धिरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज (बागेश्वरधाम सरकार) यांच्या श्रीमुखाने हनुमंत कथेचे भव्यदिव्य आयोजन दि.२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे.हनुमंत कथेसोबतच श्री १०८ कुंडी रुद्रयाग महायज्ञाचे आयोजन प.पू पंडीत माणिकलालजी पांडे (उत्तरप्रदेश) यांच्या मार्फत करण्यात आले आहे.कथेच्या प्रारंभी कलशयात्रा दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान श्री स्वयंभू महादेव मंदिर झुरखेडा येथून कथास्थळ पर्यंत पार पडणार आहे अशी माहिती अँड.उज्वल चौधरी झुरखेडेकर यांनी दिली.कथेस लाखोंच्या संख्येेने भाविकांच्या उपस्थितीची चाहूल असल्याने मदतीकरिता साधारणतः ७ ते ८ हजार स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याने स्वयंसेवक नोंदणी सुरू असून इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी गावपातळीवर ग्रुप बनवून स्वयंसेवक नोंदणी प्रक्रियेकरिता किरण चौधरी ८८८८३५३६७०,स्वप्नील चौधरी ९९७५४५३११६ यांच्याशी संपर्क साधावा.सदर कथेच्या आयोजनाची मूळ संकल्पना ही संदीप पंजाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शक्य होत असून जळगाव जिल्ह्यात प्रथमच प.पू. धिरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज (बागेश्वरधाम सरकार) यांच्या अमृतवाणीतून हनुमंत कथेचे आयोजन होत असून भाविकांनी हनुमंत कथेच्या लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments