देवगाव जिप शाळेत स्पोर्ट्स ड्रेस वाटप वाढदिवसाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यात...
देवगाव जिप शाळेत स्पोर्ट्स ड्रेस वाटप वाढदिवसाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील बिडगाव येथून जवळच असलेल्या देवगाव,येथे_कु.ओमकार याच्या वाढदिवसाच्या निमित्त जि.प.प्राथ.शाळा देवगाव ता.चोपडा येथे स्पोर्ट्स ड्रेस वाटप करण्यात आले.स्पोर्टस ड्रेस साठी ज्ञानदीप धनसिंग महाजन यांनी शाळेच्या विद्यार्थीसाठी २५ हजार रुपये रक्कम दिली.आज स्पोर्ट्स ड्रेस वाटप प्रसंगी गावातील जे.यू.महाजन
निवृत्त शिक्षक,व्ही.सी.पाटील निवृत्त शिक्षक,जे.ए.महाजन निवृत्त शिक्षक,विकास महाजन मा सरपंच,किशोर महाजन मा उपसरपंच,रामसिंग महाजन व्हाईस चेअरमन विकास सोसायटी,युवराज पाटील मा उपसरपंच,प्रवीण पाटील उपसरपंच,अरविंद मोरे प्रगतशील शेतकरी,राजेंद्र धनसिंग महाजन निवृत्त सैनिक,समाधान कोळी,राजेंद्र विक्रम,महाजन,विनायक सोनवणे ईश्वर नाईक सामाजिक कार्यकर्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापक अलका पाटील,पदवीधर शिक्षक किशोर पाटील,केशवानंद सैंदाणे,राजेंद्र पाटील उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले.गावातील व्ही.सी.पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच किशोर महाजन यांनी ज्ञानदीप धनसिंग महाजन यांचे गावाच्या वतीने आभार मानले.

No comments