हरसुल येथील पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित मंत्री नरहरी झिरवाळ यांचा नागपुर विधानभवन येथे केला सत्कार... त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम...
हरसुल येथील पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित मंत्री नरहरी झिरवाळ यांचा नागपुर विधानभवन येथे केला सत्कार...
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला बहुमत मिळाले,व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार स्थापन झाले, यामध्ये दिंडोरी -पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा मंत्री पदाची शपथ घेतली, झिरवाळ हे आदिवासींच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात,व आदिवासी नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले झिरवाळ यांचा पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने सत्कार करण्यात आला, यावेळी आमदार हिरामण खोसकर व विविध नवनिर्वाचित मंत्री यांचा देखील सत्कार करण्यात आला.यावेळी युवा नेते शारीख शेख, मा.उपसरपंच राहुल शार्दुल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा सरचिटणीस (अ.प.) स्वप्निल शार्दुल, शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख अशोक लांघे, शिवसेना शिंदे उपतालुकाप्रमुख रघुनाथ गांगोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments