साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रास बदनाम करण्याचा कूटील डाव, प्रादेशिक परिवहन कार्यालयात पैसे उकळण्यात कसे नाही तोतया पत्रकारांचे नाव,,...
साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रास बदनाम करण्याचा कूटील डाव,
प्रादेशिक परिवहन कार्यालयात पैसे उकळण्यात कसे नाही तोतया पत्रकारांचे नाव,,
संगमनेर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्यातील संगमनेर येथील अनेक ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अधिपत्याखाली अनेक चेक पोस्ट नाका आहे या सर्वच चेक पोस्ट वर दिवस भरात हजारो वाहने येतात आणि जातात या वाहनांची तपासणी या चेक पोस्ट वर केली जाते या चेक पोस्ट वर खासगी नोकर भरती करुन त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र निदर्शनास दिसून येत आहेत अनेक वेळा या चेक पोस्ट वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळे लावले मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करणारे अनेक प्रादेशिक परिवहन अधिकारी खासगी नोकर यांच्या वर कारवाई करण्यात आली सर्व वाहनधारकांना वाटत होते की आता तरी या प्रकरणाला आळा बसेल परंतू आळा घालण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांना वेळ तर मिळाला पाहिजे कारण या मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक अधिकारी याचे भागिदार असल्याचे देखील समजते केवळ आर टी ओ अधिकारी यांच्या शिप्ट बदलत असतात परंतु वाहन धारकांची लूट सुरू असतेच यात शंकाच नाही याचच फायदा उचलण्यासाठी काही तोतया पत्रकार कोणताही अधिकृत परवाना नसताना केवळ शे पाचशे रुपये खर्च करून बनावट व्हिजीटिंग कार्ड तयार करून सर्रास वापर करतात असाच काहीसा प्रकार साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रा बाबत झाला कमी कालावधीत सर्वत्र लोकप्रिय झाले असतांना या वर्तमान पत्राच्या नावे काही महाभाग भिक मागण्याचा धंदा करत असल्या कारणाचे तक्रारी आहेत तरी साप्ताहिक खरे सव्वाशेर वृत्तपत्राचे संपादक लियाकत खान पठाण यांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना विनंती वजा मागणी करीत आहेत की आमचे वृत्तपत्राचे साप्ताहिक खरे सव्वाशेर या नावाने कोणी व्यक्ती आपल्या चेक पोस्ट वर लाच मागण्यांसाठी येत असेल तर त्या व्यक्तीला तात्काळ जवळपास असणाऱ्या पोलिस प्रशासन यांच्या ताब्यात देण्यात यावे सदर तोतया पत्रकार आर टी ओ चेक पोस्ट आर टी ओ कार्यालयात केव्हापासून बोगसगिरी करतं फिरत होता हे उघडकीस येण्यासाठी वेळ लागणार नाही असे आवाहन खरे सव्वाशेर वृत्तपत्राचे संपादक लियाकत खान पठाण यांनी केले आहे वेळ पडल्यास खरे सव्वाशेर वृत्तपत्राचे संपादक यांच्या मोबाईल( 9665282010) या क्रमांकावर संपर्क साधावा साप्ताहिक खरे सव्वाशेर च्या नावाने कोणी व्यक्ती आपल्या चेक पोस्ट वर कार्यालयात आल्यास त्याचे ओळखपत्र कार्ड मागणी करण्यात यावी तर ज्या तोतया कडे ओळखपत्र नसल्यास साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रचा असा कोणी अधिकृत व्यक्ती नेमलेला नाही सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नोंद घ्यावी सविस्तर माहिती पुढील अंकात प्रकाशित करण्यात येईल
No comments