adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्जाने येथे मोठ्या उत्साहात पेसा दिन साजरा

  कर्जाने येथे मोठ्या उत्साहात पेसा दिन साजरा  चोपडा (प्रतिनिधी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज कर्जाने ग्रामपंचायत येथे शासनाच्या नुकताच जा...

 कर्जाने येथे मोठ्या उत्साहात पेसा दिन साजरा 


चोपडा (प्रतिनिधी)

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

आज कर्जाने ग्रामपंचायत येथे शासनाच्या नुकताच जाहीर झालेल्या शासनाच्या परिपत्रकानुसार पेसा कायदा जनजागृती करण्यासाठी आदिवासी पेसा क्षेत्र भागात २४ डिसेंबर आज रोजी पेसा दिवस महामानव बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन करून दिवस साजरा करण्यात आला.त्याचप्रमाणे प्रतिमेचे पूजन सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आली तेसच कर्जांणे आश्रम शाळेचे शिक्षक माननीय अपसिंग पावरा सर यांनी सगळ्यांसमोर प्रतिज्ञा वाचली. तसेच व उपसरपंच श्री प्रमोद बारेला यांनी आदिवासी समुदाय व स्वयंसहायता सशक्तिकरण,तसेच परंपरा  ज्ञान व  रूढी प्रथा जोपासण्यात यावा,पर्यावरण स्थिरतेस प्रोत्साहन  त्याचप्रमाणे बाह्य शोषण विस्थापित करणे, जमिनीचे हक्क, संसाधनाचे  संरक्षण, वनसंपत्ती वरचे अधिकार, सांस्कृतिक व परंपरागत व्यवस्थेचे संरक्षण करणे, सामाजिक न्याय अधिकार, आर्थिक स्वयं सहायता इत्यादीवर पेसा दिनाचे महत्त्व प्रमोद बारेला यांनी सांगितले. चोपडा तालुका पेसा समन्वयक श्री. सपकाळे सर,कर्जांनी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती. बाविस्कर मॅडम,ग्रामसेवक, श्री अशोक पाडवी, श्री अनर्सिंग बारेला ग्रा.सदस्य,श्रीमती. प्यारी बारेला अंगणवाडी सेविका, श्री. सुनील बारेला पोलीस पाटील, श्री बाबलू बारेला सामाजिक कार्यकर्ते, सतीश बारेला सामाजिक कार्यकर्ते श्री रतन कोकणी रोजगार सेवक,भरसिंग बारेला वनविभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद मुख्याध्यापक प्रवीण पाटील इत्यादी होते

No comments