adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत गाडगेबाबांचा खरा इतिहास समाजासमोर आणणे गरजेचे- डॉ.बालाजी जाधव

 संत गाडगेबाबांचा खरा इतिहास समाजासमोर आणणे गरजेचे - डॉ.बालाजी जाधव अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मलकापूर :- आपण जुन्या ...

 संत गाडगेबाबांचा खरा इतिहास समाजासमोर आणणे गरजेचे- डॉ.बालाजी जाधव


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मलकापूर :-आपण जुन्या रूढी व परंपरांना फाटा देत विज्ञाननिष्ठ बाबींना अंगीकारून शिक्षणाला महत्व द्यावे, आजच्या या धकाधकीच्या जिवनात शिक्षणच तुम्हाला तारणार आहे. या सोबतच गाडगेबाबांचा खरा इतिहास हा नवीन पिढीसमोर येणे गरजेचे असल्याचे मत गाथा चिंतन ट्रस्ट संभाजी नगरचे अध्यक्ष डॉ.बालाजी जाधव यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त व्यक्त केले.


सर्वभाषिक परिट (धोबी) समाज बांधव मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने श्रीसंत राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन २१ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या अंतर्गत सकाळी ८ वाजता संत गाडगेबाबा पुतळ्याला माल्यार्पण व सकाळी ११ वाजता डॉ.बालाजी जाधव व मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे या प्रमुख वत्तäयांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार राजेश एकडे, माजी नगराध्यक्ष अ?ॅड.हरीश रावळ, भाराकाँ शहराध्यक्ष राजू पाटील, माजी नगरसेवक अनिल गांधी, सुहास (बंडूभाऊ) चवरे, हरीश सुपडू, मलकापूर कृउबासचे संचालक शिवश्री योगेश पाटील, भाजपा मा.शहराध्यक्ष मिलींद डवले, संतोष बोंबटकार, प्रेमसिंग शेखावत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी डॉ.बालाजी जाधव यांनी सांगितले की, संत गाडगे बाबा यांचा इतिहास नवपिढीने वाचने गरजेचे आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत नवतरूणांनी काम केल्यास निश्चितच समाजाला त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. तर मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सचिन तायडे यांनी संत गाडगे बाबांच्या जिवनावर प्रकाश टाकीत संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या जिवनपटातून खुप शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून त्यांच्या जिवनपटाचे आकलन करावे, असे आवाहन उपस्थितांना केले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाषिक परीट (धोबी) समाज बांधवांनी परिश्रत घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन इंजि.अविनाश जामोदे यांनी केले.

संत गाडगेबाबा चालते फिरते विद्यापीठ - इंजि. सचिन तायडे

संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या जिवनपटातून खुप शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून त्यांच्या जिवनपटाचे आकलन करावे, असे आवाहन इंजि. सचिन तायडे यांनी केले.

No comments