adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणपुर विविध कार्यकारी सहकारी संस्थेत तीस लाखाच्या गैरव्यवहार किरण करंदीकर यांनी केला आरोप?

  गणपुर विविध कार्यकारी सहकारी संस्थेत तीस लाखाचा गैरव्यवहार किरण करंदीकर यांनी केला आरोप?  (मच्छिंद्र कोळी, गलंगी ता.चोपडा प्रतिनिधी) (संपा...

 गणपुर विविध कार्यकारी सहकारी संस्थेत तीस लाखाचा गैरव्यवहार

किरण करंदीकर यांनी केला आरोप? 

(मच्छिंद्र कोळी, गलंगी ता.चोपडा प्रतिनिधी)

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील गलंगी पासून जवळच असलेले गणपुर तालुका चोपडा येथील संचालक मंडळाने संस्थेत मोठ्या प्रमाणात   (तीस लाखांचा )गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती किरण करंदीकर यांनी दिली


याबाबत अधिक माहिती अशी की संस्थेतील सचिव प्रकाश राणे यांची तीन वेळा निवृत्ती झाल्यावरती ही त्यांना याच संचालक मंडळांनी व पदाधिकारी यांनी मुदत वाढ देऊन त्याच व्यक्तीला संगनमताने पाठपुरवठा देऊन प्रकरण दाबण्याच्या परिपूर्ण प्रयत्न चालू असताना नवीन सचिव सुनील सोनवणे यांना हजर करून घेण्याऐवजी अपहार लपवण्यासाठी सचिव प्रकाश राणे यांची चौथी वेळा बेकायदेशीर मुदत वाढ मागणी करत असून याचा अर्थ सचिव राणे व संचालक मंडळ यांनी सहमतीने एवढा मोठा भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे संस्थेचे खत व्यवहार प्रथम दर्शनी २८ ते ३० लाखाच्या गैरव्यवहार झाल्याचे दिसून आल्याने संस्थेने.३०/०९/२०२४ रोजी असलेली सर्वसाधारण सभा घेतली नाही असा आव्हान सादर केलेला असून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांना देखील पात्र असलेल्या सभासदांना कर्ज वाटप न केल्यामुळे सभासद अडचणीत सापडले आहेत संस्थेच्या मालकीच्या जे गाडे भाडेतत्त्वावर दिलेले आहेत त्यांच्या डिपॉझिट च्या मुदत ठेवी च्या पावत्या सुद्धा गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे याचाच अर्थ असा की २८ ते ३० लाखाच्या मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येत असताना देखील वारंवार निवेदन देऊन सुद्धा सचिव प्रकाश राणे व संचालक मंडळावरती कायदेशीर कारवाई का होत नाहीत असा मोठा प्रश्न गणपुर येथील ग्रामस्थांचे चिंतेचा विषय ठरला आहे कुठे पाणी तर मुरत नाही ना असाही प्रश्न सुज्ञ शेतकऱ्यांना ? उद्भवताना दिसून येत आहे सुनील सोनवणे यांची नियुक्ती होऊन चार महिन्यानंतर हजर करून घेतले परंतु लगेच एक महिना होत नाही तोवर संचालक मंडळाने त्यांची तक्रार करून बदलीसाठी प्रयत्न करण्याच्या उद्देश काय असाही प्रश्न सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना पडलेला आहे म्हणजेच मोठे गबाळ पचवण्याच्या काठोकाठ प्रयत्न दिसून येत असून शासनाने कडक कारवाई करावी. व सदरील प्रकरणी सखोल चौकशी केली नाही तर आम्ही गुन्हे दाखल,साखळी उपोषण करण्यासाठीचे मार्ग अवलंबिण्याचा विचाराधीन असून याला सर्व जबाबदार शासन, प्रशासन, अधिकारी व संचालक मंडळ राहील असेही किरण करंदीकर गणपुर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले तर वरील बाबींचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे  कळविले आहे 

No comments