श्री शिवाजी आ.प्राथ.जि.प.केंद्र शाळा हातेड येथे बाल आनंदमेळा संपन्न शामसुंदर सोनवणे वि.प्र.हातेड /चोपडा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दि.२०/...
श्री शिवाजी आ.प्राथ.जि.प.केंद्र शाळा हातेड येथे बाल आनंदमेळा संपन्न
शामसुंदर सोनवणे वि.प्र.हातेड /चोपडा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि.२०/१२/२०२४ रोजी श्री शिवाजी आ.प्राथ.जि.प.केंद्र शाळा हातेड येथे बाल आनंदमेळा संपन्न झाला आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेतर्फे मोठ्या उत्साहाने करण्यात आले या आनंद मेळाव्यात इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक जगताची व दैनंदिन व्यवहारिक उलाढालीची माहिती प्रत्यक्ष रूपाने घेता यावी याकरिता विद्यार्थ्यांना शाळेतर्फे संधी उपलब्ध करून देण्यात आली वरील वर्गांच्या विद्यार्थ्यांकडून जवळ जवळ शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ.सुवर्ण बाविस्कर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून हातेड बु!! चे पोलिस पाटील श्री.जितेंद्र सोनवणे ,श्री.रोहिदास शिरसाठ,श्री.नवल पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री.जितेंद्र सोनवणे,श्री.महेंद्र पाटील,श्री.निरंजन सोनवणे,सौ.ललिता भिल,सौ.अनिता पावणकर,श्री.रमाकांत देवराज, हे होते.सदर आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनेक खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते.
या द्वारे विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान प्राप्त झाले.विद्यार्थ्यांनी आनंदाची लयलूट केली.अनेक पालक सुद्धा मेळाव्यास उपस्थित होते. तर शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे, सतिश पाटील, जयवंत पवार,आशाताई पाटील, कल्पनाताई पाटील, ज्योतीताई पाटील,मनिषाताई पाटील, प्रतिक्षा वाघ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री अनिल पाटील यांनी केले.




No comments