माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची जालना जिल्हा पदाधिकारी बैठक संपन्न जळगाव/ जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक-:- हेमकांत गायकवाड...
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची जालना जिल्हा पदाधिकारी बैठक संपन्न
जळगाव/ जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक-:- हेमकांत गायकवाड )
www.dakshvedh.in या न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले
दर्पण दिन आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक कल्पतरू पार्क,अंबड चौफुली जवळ,जालना या समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली.माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशनच्या चतुर्थ वर्धापन दिन, www.dakshvedh.in वेब पोर्टलचे उद्घाटन आणि जालना जिल्ह्यातील संपूर्ण समितीच्या कार्याचा वार्षिक आढावा या अनुषंगाने बैठक घेण्यात आली.माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अधिकृत मुखपृष्ठ यानात्याने आज दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सखारामपंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते www.dakshvedh.in या न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
१० जानेवारी २०२५ रोजी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशनचा चौथा वर्धापन दिन होता,जानेवारी २०२१ मध्ये स्थापना झाल्यापासून हळूहळू विकसित होत होत फौंडेशन आणि फौंडेशन व्दारे संचालित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे आज वटवृक्षात रुपांतरण झाले आहे.अजूनही बरेच कार्य पुढे वाढवणे आणि तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,त्यासाठी समितीच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांची आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.नियोजित राज्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणीची आज एकत्रित बैठक घेवून जालना जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आली. समितीच्या विकासासाठी चार “स”कारांची चतु:सुत्री म्हणजे संपर्क,समन्वय,संघटन आणि समाजकार्य ज्यातून समितीचा विकास कसा साधायचा याचा दृष्टीकोन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांनी उधृत करून सांगितला आणि माहिती अधिकाराचा वेगवेगळ्या संकल्पनेतून कसा समाजकार्यासाठी वापर करता येतो ही भूमिका महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखारामपंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केली,मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजू शिंदे यांनी वेगवेगळ्या शासकीय स्तरावरील लुटमार आणि सामाजिक समस्या त्यावर वेगवेगळ्या भूमिकेतून उपाय करण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि संघटनात्मक कार्य वाढवण्यासाठी मराठवाडा विभागीय समन्वयक रमेश सुरशे यांनी प्रतिपादन केले.बैठकीस जालना जिल्हा उपाध्यक्ष गोविंद जोशी,जाफ्राबाद तालुका अध्यक्ष अशोक म्हस्के,कार्याध्यक्ष राजेश दामधर,का.स.गजानन फलफले,सुरेश खंदाडे,गोदावरी लेंभे,देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष सुरेश धारे,उपाध्यक्ष समाधान निकाळजे,घनसावंगी तालुका उपाध्यक्ष अर्जुन ढेरे,शंकर हिवाळे,जालना तालुका उपाध्यक्ष कोंडीबा अनपट,भोकरदन तालुका सहसचिव गोपाळ गुजर,मंठा तालुका अध्यक्ष निवृत्ती गायके,पैठण तालुका सहसचिव ऋषिकेश सुरशे यांची उपस्थिती होती.आजपर्यंत केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून सत्कार करण्यात आला जसे की,राजू शिंदे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी,रमेश सुरशे यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष पदी,अशोक म्हस्के यांची जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी,सुरेश धारे यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी,निवृत्ती गायके यांची जालना जिल्हा सहसचिव पदी,राजेश दामधर यांची जाफ्राबाद तालुका अध्यक्ष पदी,गोदावरी लेंभे यांची जाफ्राबाद तालुका महिला अध्यक्ष पदी,अर्जुन ढेरे यांची घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी,ऋषिकेश सुरशे यांची छ.संभाजीनगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे,अशी माहिती समितीच्या अध्यक्षांनी दिली.

No comments