ललित फिरके आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित पत्रकार ललित फिरके यांचा सन्मान करताना सुधीर गाडगीळ सोबत अजित वडगावकर, डॉ. दीपक पाटील, शिव...
ललित फिरके आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
![]() |
| पत्रकार ललित फिरके यांचा सन्मान करताना सुधीर गाडगीळ सोबत अजित वडगावकर, डॉ. दीपक पाटील, शिवचरण उज्जैनकर, डॉ. सुरेंद्र हेरकर व मान्यवर |
इदू पिंजारी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर- न्हावी येथील जेष्ठ पत्रकार तथा म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित कुमार निळकंठ फिरके यांना मुक्ताईनगरच्या ऊज्जैनकर फाउंडेशन कडून ( फाउंडेशनच्या १५ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधत ) पत्रकारिता क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केल्यामुळे तसेच समाजातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करून पत्रकाराच्या माध्यमातून त्या बाबींचे निर्भीड व प्रामाणिकपणे समाजासमोर मांडून एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे त्या आपल्या सेवेचा गौरव म्हणून आपणास आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आळंदी देवाची येथे उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे संमेलन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या ७४५ व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवानिमित्त श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते. पत्रकार ललित कुमार फिरके यांना हा पुरस्कार सुप्रसिद्ध निवेदक तथा मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.प्रसंगी जेष्ठ कवयित्री प्रा.सुमती पवार, ज्ञानेश्वर चरित्र समिती आळंदीचे अध्यक्ष प्रकाश काळे,श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची चे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.ज्ञानेश्वर (दीपक) पाटील, एम आय टी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरेंद्र हेरकर यांच्यासह रामचंद्र कुऱ्हाडे पाटील, सौ.रूपाली चिंचोलीकर व उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर उपस्थित होते

No comments