adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे टी महाजन पॉलिटेक्निक मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर कार्यशाळा संपन्न

 जे टी महाजन पॉलिटेक्निक मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर कार्यशाळा संपन्न वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर बोलताना प्रा.व पु ...

 जे टी महाजन पॉलिटेक्निक मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर कार्यशाळा संपन्न

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर बोलताना प्रा.व पु होले, प्राचार्य पी एम राणे, एस जी निकम व मान्यवर

इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

न्हावी मार्ग फैजपूर येथील जे टी महाजन पॉलिटेक्निक मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली . त्यानिमित्त वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रथमतः लेखक प्रा. व. पु. होले  यांनी विद्यार्थ्यांना वाचावे कसे व कशासाठी वाचावे, तसेच काय वाचावे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दुसरे मार्गदर्शक भारत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक  एस. जी. निकम  यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे साहित्य कृतीची माहिती व वाचनातून कोणत्या गोष्टी घ्याव्यात व कोणते संस्कार मूल्य स्वीकारून आपला व आपल्या आई-वडिलांचा गुरुजनांचा उद्धार करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. जे टी महाजन पॉलिटेक्निक चे प्राचार्य पी. एम. राणे  यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कोणती मूल्य आवश्यक आहेत याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव बोरोले, लोकेश नेमाडे, प्रफुल्ल बोलाणे, लावण्य भोळे, तेजल बोरोले, नुपुर किरंगे, प्रांजल चौधरी, मिताली पाटील, भावेश महाजन, ओम महाजन, युगांत नेहेते यांनी पुस्तक वाचन केले.तसेच पुस्तक परीक्षण व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.यांनी पुस्तकांचे वाचन  केले व वाचन करण्याचा संकल्प केला . सदर कार्यक्रमास प्राचार्य पी एम राणे, प्रा. व. पु होले,  एस जी. निकम,  ग्रंथपाल अरविंद भंगाळे,श्री विलास लोंढे, सर्व विभाग प्रमुख व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच या अभियानांतर्गत दि. ८ जानेवारी ते दि. १५ जानेवारी पर्यंत पुस्तक परीक्षण, कथाकथन, निबंध , लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेतील तीन उत्कृष्ट विद्यार्थांची निवड करण्यात येईल व त्यांना २६ जानेवारी २०२५ रोजी बक्षीस वितरण करण्यात येईल . या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सेक्रेटरी विजय झोपे, सहसचिव  शशिकांत चौधरी यांनी कौतुक केले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रा. सोनाली फेगडे, प्रा.रूपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले.

No comments