शासकीय आदिवासी चोपडा वस्तीगृहातील मुला मुलींचे विविध समस्यांचे तात्काळ निवारण करण्याची मागणी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) ...
शासकीय आदिवासी चोपडा वस्तीगृहातील मुला मुलींचे विविध समस्यांचे तात्काळ निवारण करण्याची मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मा. बबलू जी साहेब यांना आदिवासी विकास विभाग यावल मार्फत मा.आदिवासी विकास मंत्री माननीय जिल्हाधिकारी,सो कार्यालय जळगाव माननीय प्रकल्प अधिकारी सो, कार्यालय यावल, मा.प्रा. चंद्रकांत सोनवणे विधानसभा मतदारसंघ चोपडा यांना शासकीय आदिवासी चोपडा वस्तीगृहातील मुला मुलींचे विविध समस्यांचे तात्काळ निवारण होण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले तर दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत
१)आदिवासी मुला मुलींचे ऍडमिशन बाकी आहेत त्यांची लवकरात लवकर व्यवस्था करुन तात्काळ प्रश्न मार्गी लावावे.
२)मुला मुलींचे भत्ता, डीबीटी लवकरात लवकर मिळावे.
३)दीनदयाल उपाध्याय स्वयम् आलेल्या अर्जाची लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या रोख रक्कम अदा करण्यात यावे
४) एम एस डब्ल्यू, नर्सिंग, डिप्लोमा, इत्यादींचे प्रलंबित रक्कम तात्काळ देण्यात यावे
५) शासकीय आदिवासी मुलींची वस्तीगृहातील गृहपाल सरडे मॅडम विद्यार्थिनी सोबत व्यवस्थित वागणूक नसून किंवा पालकांना उद्धट भाषेत बोलनं म्हणून यांची बदली लवकरात लवकर करण्यात यावी.
६)एस एस खंबायत यांची वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांची बदली झाली नाही. कारवाई सुद्धा झाली नाही. यांची बदली सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावी.
७)आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृहातील सांस्कृतिक कार्यक्रम ची व्यवस्था करण्यात यावी.
८)एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथील विविध योजनांचे लाभ पुरवणीसहित छापित विद्यार्थ्यापर्यंत प्रचारण करण्यात यावे.
९)सदर वेले तालुका चोपडा येथील इंग्लिश मीडियम बसची व्यवस्था कमी असल्यामुळे खूप प्रमाणावर विद्यार्थ्यांना त्रास होतोय तरी बसची व्यवस्था वाढविण्यात यावे.
तरी माननीय महोदय साहेबांना वरील विषयांचे निवारण लवकरात लवकर झाले नाही तर मुला मुलींचे वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चोपडा जिल्हा जळगाव तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यास सदर संबंधित आदिवासी विकास विभाग यावल जबाबदार राहील हे नम्र विनंती तर रस्ता रोको आंदोलन हि दि: ०४/०२/२०२५ रोजी करण्यात येईल असे हि प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
मा. नामा भाऊ (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा अध्यक्ष जळगांव)
मा. करण पावरा ( उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख)
मा. संजय पाडवी (सा. कार्यकर्ता)
मा. शशिकांत पावरा (सा. कार्यकर्ता)


No comments